मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तर दुसरीकडे लसीचा तुटवडा आहे. यातच मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला हा आरोपी रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारा होता. अटक केलेल्या व्यक्तीकडून रेमडेसिवीरच्या 12 लसी (इंजेक्शन) जप्त करण्यात आले असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध गुन्हे शाखेकडून केला जात आहे.
मुंबई गुन्हे शाखेने अधिकाऱ्यांना त्यांच्या खबरीकडून माहिती मिळाली होती की अंधेरी ते जोगेश्वरी परिसरामध्ये रेमडीसीवीरचा काळाबाजार केला जात आहे, या महितीच्या आधारे गुन्हे शाखा क्रमांक 10 ने सापळा रचला आणि त्या परिसरामध्ये छापेमारी सुरू केली. छापेमारी मध्ये रेमडेसिवीरच्या 12 लस सापडल्या, ज्याच्याकडे ही लस सापडली त्या व्यक्तीला गुन्हे शाखेने अटक केली आहे.
आतापर्यंत 284 रेमडेसिवीर जप्त
मुंबई पोलिसांनी केलेल्या या छापेमारीत 272 रेमडेसिवीर जप्त करण्यात आली असून आतापर्यंत एकूण 284 रेमडेसिवीर जप्त करण्यात आले आहेत. रेमडेसिवीर लस ही कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांना लवकर बरा होण्यासाठी दिली जाते. कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता या लसीची मागणी वाढली आहे त्यामुळे काही असामाजिक तत्त्व या लसीचा काळाबाजार करून लोकांच्या जीवाची खेळत आहेत. या लासीची किंमत 1200 रु आहे, मात्र काळाबाजार करणारे ही लस 5500 ते 6000 रुपयांना विकत आहेत.
रेमडेसिवीर लसीचा काळाबाजार होतो याच्या तक्रारी वारंवार मिळत आहेत. याच अनुषंगाने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लस बनवणाऱ्या सात कंपन्यांसोबत गुरूवारी बैठकसुद्धा केली जेणेकरून या लसीचा काळाबाजारावर अंकुश लावता येईल....
तसेच लोकांना सुद्धा आवाहन करण्यात आला आहे की त्यांनी अशा प्रकारे जास्त पैसे देऊन ही लस विकत घेऊ नये, जर जास्त पैसे देऊन लोकांनी लस विकत घेतली तर काळाबाजार करणाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि याला अंकुश लावण्यास अडथळे निर्माण होईल. यासाठी जर लसीचा काळाबाजर थांबवायचा असेल तर लोकांनी हे करणं अपेक्षित आहे.
गुन्हे शाखेकडून या रॅकेट मध्ये अजून कोणाचा समावेश आहे, ही लस कुठून आणली जात होती आणि कोणाला लस विकणार होते याचा तपास केला जात आहे. त्यामुळे गुन्हे शाखेच्या तपासात काय समोर येतंय ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
महत्वाच्या बातम्या :