मुंबई : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. व्यापारी आणि सामान्य नागरिकांवर मोठे निर्बंध आल्याने राज्य सरकारला त्यांच्या असंतोषाला सामोरे जावं लागते आहे. अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांच्या सेवेसाठी रिक्षा -टॅक्सी-बस प्रवासाला सरकारने मुभा दिली आहे. मात्र, ही मुभा देताना पंक्चर काढणारी गॅरेज आणि गाड्यांचे सुटे पार्ट विकणारी दुकाने मात्र बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे वाहन चालकांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे "आम्ही सर्व नियम पाळू मात्र व्यापार करण्यास परवानगी मिळावी", अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.
या संदर्भात राज्यातील विविध व्यापारी संघटनाच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या वेळी राज्य सरकारने दोन दिवसांचा अवधी मागून घेतला असल्याचं स्कूटर्स पार्ट डिलर असोसिएशनचे देवेश दानी म्हणाले. आम्ही सर्व नियम पाळू मात्र व्यापार करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी ग्रॅंड रोडवर दुकाने असणाऱ्या संघटनेच्या
पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
तिकडे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांना वर्क फ्रॉम होम सुरु आहे. मात्र, लॅपटॉप, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने मात्र सध्या बंद आहेत. त्यामुळे जर आपला लॅपटॉप आणि राउटर वगैरे बंद पडलं कुठे जायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर तो सहाजिक आहे. मात्र, राज्य सरकारने या दुकानांवर कडक निर्बंध आणत त्यांचे व्यवहार सकाळी देखील बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जर तुमचा लॅपटाॅप किंवा राउटर काम करताना बंद पडला तर तुमची देखील अडचण होणार आहे.
मुंबईतील लॅमिंग्टन रोडवर इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर पार्ट्स आणि लॅपटॉपचं मोठं प्रस्त आहे. मात्र, कडक निर्बंधांमुळे येथील 1200 दुकानांमधील व्यवहार बंद आहे. हे मार्केट मुंबईतील सर्वात मोठं मार्केट म्हणून गणलं जातं. ज्यात कम्प्युटर्सचे पार्ट, इलेक्ट्रॉनिक्स पार्ट, टीव्ही उपकरणे आणि मेडिकलला लागणाऱ्या उपकरणांचाही समावेश आहे. दुकाने बंद असल्यानं व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. ज्यात लाईट बील, कर्मचाऱ्यांचे पगार इतर देयके देतांना अडचणी येतील असं ट्रेड असोसिएशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीची पदाधिकारी म्हणाले.
संबंधित बातम्या :