या सर्व गोंधळत अहमदपूरकर महाराजांना भेटण्यासाठी अनेक महाराज आले होते. त्याचवेळी अहमदपूरकर महाराजांनी त्याच्या हाडोळती आणि अहमदपूर मठाचे उत्तराधिकारी नेमुन त्यांची नावे जाहिर केली. यात हाडोळती मठाचे उत्तराधिकारी राजकुमार स्वामी आणि अहमदपूर मठासाठी राजेश्वर स्वामी यांची नियुक्ति करण्यात आली आहे. माझी प्रकृती उत्तम आहे भक्तांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे सांगत अहमदपूकर महाराज उपचारासाठी नांदेडला रवाना झाले.
शिवा संघटना आणि ट्रस्ट यांच्या ऐकमेकांविरोधात तक्रारी
हा सगळा घटनाक्रम होत असतानाच शिवा संघटनेचे प्रा. मनोहर धौंडे यांनी भक्तस्थळच्या ट्रस्ट वरील पदाधिकाऱ्यांवर आरोप केला आहे, की 50 कोटीच्या संपत्तीसाठी संजीवन समाधीची घाट घातला गेला. त्यांनी तशी तक्रारही दिली. मात्र, त्यांच्या आरोपाला प्रतिउत्तर देत ट्रस्टने तक्रार दिली आहे.
जीवंत समाधीची अफवा पसरली अन् राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेशमधून लोकांची अहमदपूरमध्ये तुफान गर्दी
अहमदपूरकर महाराज हे अहमदपूर मठाचे सोळावे मठाधीश आहेत. हाडोळती, अहमदपूर येथील मठ तसेच अहमदपूर शहरा जवलील 14 एकर जागेत भक्तिस्थळ आहे. यावर ट्रस्टींना काहीही अधिकार नाही. आम्ही फक्त त्यांचा कार्यभार पाहत आहोत. अहमदपूरकर महाराजांनी आदेश केल्यामुळे आम्ही हे काम करतोय, यात आमचा कोणताही हेतु नाही. शिवा संघटनेचे धौंडे यात ट्रस्टीवर येण्यासाठी इच्छुक होते. यामुळे नको त्या वादाला त्यांनी तोंड फोडले आहे, असा आरोप ट्रस्टीचा आहे.
या सर्व घटनेबाबत अहमदपूरकर महाराज काही दिवसात स्वतःची भूमिका स्पष्ट करतील. तोपर्यंत आरोपप्रत्यारोप सुरुच राहतील.
डॉ. शिवसिंग शिवाचार्य महाराज यांचे अहमदपूर आणि हाडोलतीच्या मठांसाठी दोन उत्तराधिकारी जाहीर