IAS Probationers Pooja Khedkar:  प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांची सध्या राज्यासह देशभरात चर्चा सुरू आहे. पूजा खेडकर यांची नियुक्ती, यूपीएससी परीक्षा देताना त्यांनी सादर केलेले दिव्यांग असल्याचे प्रमाणापत्र, नॉन क्रिमेलियरचे प्रमाणपत्र असे सर्वकाही संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. दरम्यान, ट्रेनी आयएएस पूजा खेडकर (Pooja Khedkar) आणि कुटुंबीयांचा पाय दिवसेंदिवस खोलात जात असल्याचं पाहायला मिळत आहे.


आधी ट्रेनी असतानाही आयएएस यांनी जिल्हाधिकारी असल्याप्रमाणे केलेला रुबाब, त्यांच्या खाजगी गाडीवर लावलेला लाल दिवा आणि त्यानंतर आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांनी पिस्तुल हातात घेत, शेतकऱ्यांवर केलेली दादागिरी यांसह समोर आलेल्या अनेक प्रकरणांमुळे आता पूजा खेडकर (Pooja Khedkar) आणि त्यांच्या कुटुंबीयाच्या अडचणींत सातत्याने आणखी वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणाचा अहवाल राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Director General of Police Rashmi Shukla) यांनी मागवला आहे. असे असताना या प्रकरणी पूजा खेडकर यांना जन्मठेपेची  शिक्षा व्हायला पाहिजे, अशी मागणी प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार  बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केली आहे.


UPSC सारखी संस्था जर अशी वागत असेल तर आता उरलं काय? 


राज्यात सध्या प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे रोज नवे कारनामे पुढे येत आहे. यात चक्क हाय कोर्टाचे निकाल बदलायला लागले आहेत. युपीएससी (UPSC) सारखी संस्था  जर अशी संशयास्पद वागत असेल तर आता राहिले काय? असा सवाल  बच्चू कडू यांनी उपस्थित केली आहे. युपीएससी (UPSC) सारखी संस्था जर अशी वागत असेल तर त्याला सुद्धा कठोर दंडात्मक कारवाई केली पाहिजे, शिवाय यात जे दोषी अधिकारी आणि कर्मचारी  असतील त्यांच्यावर देखील काठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. जेणेकरून पुन्हा असा कोणी गुन्हा करणार नाही, याची अद्दल सरकारने घडवली पाहिजे आणि अशा प्रकारची व्यवस्था आता केली पाहिजे. अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. 


प्रमाणपत्रानुसार पूजा खेडकर 51% दिव्यांग


वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत आणखी एक खुलासा समोर आला आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून खेडकर यांना दोन प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यानंतर या दोन्हीच एकत्र करून एक दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले होते. दरम्यान, 2018 साली जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय मंडळाने दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रात खेडकर यांना 40% दिव्यांग तर 2021 साली मानसिक आजाराच्या प्रमाणपत्रात 20% दिव्यांग असल्याच प्रमाणपत्रात नमूद असल्याचे डॉ. संजय घोगरे यांनी सांगितले आहे.


दरम्यान, पुन्हा मार्च 2021 मध्ये हे दोन्ही प्रमाणपत्र एकत्र करून देण्यात आले होते. दोन्ही प्रमाणपत्राची बेरीज जरी 60 टक्के होतं असली, तरी सॉफ्टवेअरने ऑटो जनरेटर करून 51 टक्के दिव्यांगत्व असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे यांनी सांगितले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या