सांगली : सांगली महानगरपालिकेच्या महासभेत आज काँग्रेसच्या महिला नगरसेविकेचा तुफान राडा पाहायला मिळाला. आपल्या प्रभागातील विकासकामांच्या फाईल्स आयुक्तांकडून मंजूर होत नसल्याचा आरोप करत, दगडाने आपलं डोकं फोडून घेण्याचा प्रयत्न केला.
सांगली महापालिकेची निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यातच महापालिकेतील विद्यमान नगरसेवक आपापल्या प्रभागातील नवनवीन विकासकामे मार्गी लावण्यासाठी आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहेत.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सातच्या नगरसेविका सुरेखा कांबळे यांनी आपल्या प्रभागातील विकासकामांची फाईल आयुक्तांकडे सादर केली होती. पण आयुक्त विकासकामांच्या फाईल्स मंजूर करत नाहीत, असा काही नगरसेवकांचा आरोप आहे.
याच कारणावरुन काँग्रेसच्या सुरेखा कांबळे या नगरसेविकेनं हा प्रताप केला. यामुळं सभागृहात चांगलाच गोंधळ झाला. नगरसेविका कांबळे यांना आवरण्याताना इतर महिला नगरसेविकांची मोठी तारांबळ उडत होती.
सांगली महापालिकेत काँग्रेस नगरसेविकेचा राडा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Mar 2018 01:26 PM (IST)
सांगली महानगरपालिकेच्या महासभेत आज काँग्रेसच्या महिला नगरसेविकेचा तुफान राडा पाहायला मिळाला. आपल्या प्रभागातील विकासकामांच्या फाईल्स आयुक्तांकडून मंजूर होत नसल्याचा आरोप करत, दगडाने आपलं डोकं फोडून घेण्याचा प्रयत्न केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -