कोल्हापूर : एकीकडे सीबीएसईच्या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेमुळे डोक्याचा ताप वाढला आहे. तर दुसरीकडे कोल्हापुरात दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा संपताच मोठा जल्लोष केला. एस. एम. लोहिया शाळेच्या विद्यार्थ्यांनी चक्क हलगीच्या तालावर ठेका धरला. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.


एकीकडे परीक्षेत पेपर अवघड गेला. आता निकाल काय येणार, घरी काय उत्तर देणार. मित्रांमध्ये किती नाचक्की होईल? अशा विचित्र प्रश्नांतून अनेक विद्यार्थी टोकाचं पाऊल उचलतात आणि आपलं अमूल्य जीवन संपवतात. मात्र या विद्यार्थ्यांचा जल्लोष पाहून त्यांचं कौतुक करण्याचा मोह आवरत नाही.

दरम्यान, कोल्हापूरच्या या विद्यार्थ्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात बराच व्हायरल होत आहे.

VIDEO :