एक्स्प्लोर

लोकसभेसाठी नागपूरमधून विलास मुत्तेमवार यांचा पत्ता कट?

राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेसची ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. त्यामुळे 'नवा गडी, नवा राज्य' या नियमानुसार राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेत काही बदलही केले आहेत. स्थानिक स्तरावर निरीक्षकांकडून होणारी चाचपणी आणि त्यातून पुढे येणारी नावं प्रामुख्याने चर्चेला घेणं, हा त्या बदलाचाच एक भाग आहे.

नागपूर : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नागपूरमधून नितीन गडकरींच्याविरोधात शड्डू ठोकणाऱ्या विलास मुत्तेमवार यांना यंदा काँग्रेस संधी देणार नसल्याची शक्यता आहे. प्राथमिक चाचपणीत सात वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या विलास मुत्तेमवार यांचा पत्त कट झाल्याचं समजतं. एबीपी माझाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. विलास मुत्तेमवार ऐवजी बबनराव तायवाडे, प्रफुल गुडढे आणि माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नावाची चर्चा आहे. विशेष म्हणजे नितीन गडकरींविरोधात निवडणूक लढण्यासाठी भाजपमधून काँग्रसमध्ये दाखल झालेल्यांच्या नावाची चर्चाही काँग्रेस कमिटी करताना दिसत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार ही नावे आहेत बबनराव तायवाडे, प्रफुल गुडढे आणि माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक. पण चौथं नाव म्हणजे शहर अध्यक्ष विकास ठाकरे. आजपर्यंत ठाकरे म्हणजेच मुत्तेमवार असं होते. विकास ठाकरेंसाठी मुत्तेमवार अनेक लढे लढले आणि मुत्तेमवारांचा गट शहरात मजबूत होता, याचं सर्वात मोठे कारण होतं विकास ठाकरे यांची ग्राऊंड लेव्हलवरील ताकद. दोघांनीही आपल्या भूमिका आणि कामाचं नीट सीमांकन केलं होतं. पण प्राथमिक चाचपणीत मुत्तेमवारांचं नाव वगळून समोर येणारं चौथं नाव हे विकास ठाकरेंचं असेल, असं या दोघांनाही वाटलं नसेल. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेसची ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. त्यामुळे 'नवा गडी, नवा राज्य' या नियमानुसार राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेत काही बदलही केले आहेत. स्थानिक स्तरावर निरीक्षकांकडून होणारी चाचपणी आणि त्यातून पुढे येणारी नावं प्रामुख्याने चर्चेला घेणं, हा त्या बदलाचाच एक भाग आहे. राजा बदलला असला, तरी नागपूरचे गटातटाचे राजकारण जैसे थेच आहे. विजय वडेट्टीवार हे निरीक्षक आहेत. त्यामुळे ही नावं जरी निरीक्षकांनी मुंबईच्या बैठकीत पुढे ठेवली, तरी दिग्गजांचं म्हणणंही ऐकलं जाणार आहे. यात मुत्तेमवार यांच्यासारखंच नितीन राऊत, आशिष देशमुख, नाना पटोले यांनाही कार्यकर्त्यांची पसंती नसल्याचं चित्र आहे. मात्र या दिग्गजांचं आपलं एक स्थान असल्यामुळे, या प्राथमिक चाचपणीला फार महत्त्व देत नाही, अशी प्रतिक्रिया विलास मुत्तेमवार यांनी दिली आहे. ही चार नावंच का आणि मुत्तेमवार का नाहीत? या उत्तर असं आहे की, निरीक्षकांनी कार्यकर्त्यांशी वेगवेगळ्या स्तरावर चर्चा केल्यावर सर्वात जास्त समर्थन असणारी ही चार नावं निघाली. ही चार नावं जनसंपर्कात पुढे, तळागाळात काम करणारी आणि कार्यकर्त्यांचं मत मिळालेली आहेत. पण याबरोबरच अजून एक महत्वाचा सूर जो समोर आला तो म्हणजे गडकरींसमोर जातीय समीकरण बदलून उमेदवार द्यावा. उमेदवार बहुजन असावा. मग प्रफुल गुडढे असो की विकास ठाकरे, बबनराव तायवाडे असो की राजेंद्र मुळक चौघेही कुणबी समाजाचे आहेत, जो नागपूरचा एक मोठा मतदाता वर्ग आहे. नागपुरात काँग्रेसजनच अनेक वेळा हे म्हणताना आढळतात की 'ये काँग्रेस है, शेवटच्या क्षणी काहीही होऊ शकते'. जिथे डबल बी फॉर्म वाटले जातात, जिथे पक्षाने अधिकृत म्हणून चक्क कोर्टात पाठवलेली नावंही विरोधी पक्षनेता म्हणून मान्य होत नाही. जिथे कार्यकर्ताच थेट प्रदेशाध्यक्षाच्या चेहऱ्यावर शाइफेक करतो, तिथे खरंच कितीही चाचपण्या घेतल्या तरी शेवटी काय होईल हे सांगता येत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Embed widget