Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुक 2024 (Lok Sabha Elections 2024) च्या पाचव्या टप्प्यासाठी देशात 49 जागांवर मतदान (Voting) सुरू झालंय. तर महाराष्ट्रातील (Maharashtra Lok Sabha Election 2024) 13 जागांवर आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रातला हा मतदानाचा शेवटचा टप्पा असेल. मुंबईतील सर्व सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या 13 जागांवर आज मतदार आपला हक्क बजावणार आहेत. अशातच काही ठिकाणी मतदारांना वेगवेगळ्या पद्धतीने आवाहन करत मतदानापासून दूर ठेवण्याचा अथवा केवळ काही ठराविक पक्षाला मतदान करण्याचे सांगण्यात येत असल्याचे समोर आले आहे. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे.


मुद्दाम मतदानापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न   


आज मुंबईतल्या 6 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये मुंबईतल्या मुस्लिम समाजाने नोटाला मतदान करावं, असं आवाहन मुस्लिम सेवाभावी संस्थांनी केलं आहे. यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काही लोक एखादा कागद काढतात आणि जाणून बुजून त्या धर्मातील लोकांना मतदानापासून दूर करण्याचे काम करतात, असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्याना लगावला आहे. तर सध्या मोदी सरकारची जी तानाशाही सुरू झाली आहे, त्यापासून देशाला वाचविण्याकरिता आपल्याला मतदान करावे लागणार आहे, असेही नाना पटोले म्हणाले.


राजकारणात जर-तर ला अर्थ नसतो 


राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांसोबत गेलो नसतो तर मी मुख्यमंत्री झालो असतो असे वक्तव्य केले होते. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, राजकारणामध्ये जर तर ला अर्थ नसतो. देशामध्ये जनतेचे महागाई आणि बेरोजगारीचे प्रश्न महत्वाचे आहेत. ते प्रश्न मांडायला पाहिजे आणि काँग्रेस ते प्रश्न रोखठोकपणे मांडत आली आहे.असेही नाना पटोले म्हणाले. शेवटच्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये सत्तेतील भाजपने मागील 10 वर्षात विकास केला, असा आव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुळात कुठेही विकास न केल्यामुळे ते पटवून देण्यात अपयशी ठरले. भ्रष्टाचारी, तानाशाह व्यवस्था, केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर, बेरोजगारी,  शेतकऱ्यांवरील अन्याय यावर  ना देशाचे पंतप्रधान बोलले, ना राज्याचे मुख्यमंत्री. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड चीड आहे. ही चीड आता मतातून व्यक्त होईल, असेही नाना पटोले म्हणाले.


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे म्हणाले होते की, 2004 मध्ये प्रफुल पटेल हे भाजपाच्या वाटेवर होते.  त्यावेळी छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री करायचा होते, असं वक्तव्य केले होते. यावर नाना पटेल यांना विचारले असता ते म्हणाले की,  कोण मुख्यमंत्री झाला, कोण मंत्री झाला, कोणी किती उजेड पाडला हे महत्त्वाचं नाही. तर काँग्रेससाठी जनतेचे मत मुद्दे महत्त्वाचे आहेत.असे म्हणत या विषयावर अधिक बोलणे नाना पटोले यांनी टाळले आहे.


ज्यांना गरिबांची, शेतकऱ्यांची जाण नाही, असे जिल्ह्याचे नेते राहिलेत 


गोंदियाच्या बिरसी येथे नुकतेच विमानतळ बांधण्यात आले आहे. विमानतळावरून हे विमानतळ प्रफुल पटेल यांनी सामान्य जनतेसाठी नव्हे तर स्वतःसाठी बांधलं, अशी चर्चा सुरू असताना यावर नाना पटोले यांना विचारले असताना नाना पटोले म्हणाले की, ज्याला शेतकऱ्यांची आणि गरिबांची जाण नाही अशी लोक या जिल्ह्यांमध्ये नेते म्हणून राहिलेत आणि यामुळे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या जनतेवर अन्याय झाला आहे. मात्र, 4 जून नंतर आमचं सरकार आलं तर मी जातीने बिरसी विमानतळाच्या विषयाकडे लक्ष देणारा असल्याचेही नाना पटोले म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या