एक्स्प्लोर

गुरुदास कामत यांचा काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसची यादी जाहीर झाली तेव्हाच आपल्याला सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करा, अशी मागणी आपण काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींकडे केली होती, असं कामत यांनी म्हटलं आहे. गुरुदास कामत हे सध्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आहेत. तर त्यांच्याकडे गुजरात, राजस्थान, दादरा आणि नगर हवेली, दमन दिव या राज्यांची जबाबदारी आहे. शिवाय ते काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्यही आहेत. त्यांनी या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर आणि मतदानाच्या दिवशीही आपल्याला सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करावं, अशी मागणी राहुल गांधींकडे केली होती. त्यानुसार आपण राजीनाम्याचा निर्णय घेतला, अशी माहिती कामत यांनी ट्वीटरवरुन दिली. दरम्यान यापूर्वीही गुरुदास कामत यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर 15 दिवसातच त्यांनी हा निर्णय मागे घेतला. शिवाय मुंबई महापालिका निवडणुकीच्या काळात त्यांचे आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांचे वाद समोर आले होते. गुजरातच्या प्रभारीपदावरुन हटवल्याने नाराजी? गुरुदास कामत यांच्याकडे सध्या गुजरातचं प्रभारी पद आहे. मात्र गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने गुजरातची जबाबदारी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे दिली आहे. गुजरातची जबाबदारी काढून घेतल्याने कामतांनी राजीनामा दिला का, अशी चर्चा सध्या सुरु आहे. गुरुदास कामत यांचा राजकीय प्रवास:
  • 1976 साली एनएसयूआयचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती
  • 1984 साली पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर
  • पाच वेळा ईशान्य मुंबईमधून लोकसभेत प्रतिनिधित्व
  • 2009 ते 2011 यूपीए सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम
  • केंद्रीय गृहखातं आणि दूरसंचार मंत्रालयाचाही अतिरिक्त कारभार
  • 2014  साली शिवसेनेच्या गजानन किर्तीकरांकडून कामतांचा पराभव
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra News LIVE Updates: देश-विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates: देश-विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Palghar Accident: हसत्या-खेळत्या वऱ्हाडावर काळाची झडप! नवरीच्या घराजवळच 100 प्रवाशांचा आयशर ट्रक अपघातात चक्काचूर; 13 जणांचा करुण अंत, पालघरमध्ये नेमकं काय घडलं?
हसत्या-खेळत्या वऱ्हाडावर काळाची झडप! नवरीच्या घराजवळच 100 प्रवाशांचा आयशर ट्रक अपघातात चक्काचूर; 13 जणांचा करुण अंत, पालघरमध्ये नेमकं काय घडलं?
Nagpur : बेपत्ता मुलीच्या शोधासाठी कुटुंबाच्या विनवण्या, पोलीसांचा गजब तर्क, म्हणाले 'गाडीत डिझेल नाही', नागपुरातील 'त्या' अधिकाऱ्यावर कारवाई होणार, पालकमंत्र्यांचे आदेश
बेपत्ता मुलीच्या शोधासाठी कुटुंबाच्या विनवण्या, पोलीसांचा गजब तर्क, म्हणाले 'गाडीत डिझेल नाही', नागपुरातील 'त्या' अधिकाऱ्यावर कारवाई होणार, पालकमंत्र्यांचे आदेश
Heat Wave: विदर्भात आज उन्हाचा 'रुद्रावतार'; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
विदर्भात आज उन्हाचा 'रुद्रावतार'; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

व्हिडीओ

Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा
Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?
Sunetra Pawar Letter Special Report : वहिनींची सही, पार्थची शाई, दादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय?
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanju Samson Heinrich Klaasen Fight Video CSK vs SRH IPL 2026: हेनरिक क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजू सॅमसनचं हे रुप तुम्ही कधी पाहिलं नसेल, VIDEO:
क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजूचं हे रुप तुम्ही कधी पाहिलं नसेल, VIDEO:
Petrol Diesel price Hike: पेट्रोल-डिझेलच्या भावात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?
पेट्रोल-डिझेलच्या भावात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Sunetra Pawar EV Car: पंतप्रधान मोदींकडून डिझेल बचतीचं आवाहन, सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय, चमचमत्या सोनेरी रंगाची नवी ईव्ही कार पाहिलीत का?
पंतप्रधान मोदींकडून डिझेल बचतीचं आवाहन, सुनेत्रा पवार ईव्ही कार वापरणार, चमचमत्या सोनेरी रंगाची नवी कार पाहिलीत का?
MS Dhoni CSK vs SRH IPL 2026: तू ना जा मेरे बादशाह...MS धोनीने निवृत्तीचे दिले संकेत; चेन्नईतील शेवटच्या टीम फोटोनंतर काय घडलं?, VIDEO
तू ना जा मेरे बादशाह...MS धोनीने निवृत्तीचे दिले संकेत; चेन्नईच्या टीम फोटोनंतर काय घडलं?, VIDEO
Heat Wave: विदर्भात आज उन्हाचा 'रुद्रावतार'; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
विदर्भात आज उन्हाचा 'रुद्रावतार'; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Meta Layoffs : मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
Embed widget