एक्स्प्लोर

राज्यातही काँग्रेसची मोर्चेबांधणी, विविध समित्या जाहीर

दुसरीकडे राज्यातही आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील विविध समित्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे यांची प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई : काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मोठी खेळी केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर दुसरीकडे राज्यातही आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील विविध समित्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे यांची प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जाहीरनामा समितीचे प्रमुख बनवण्यात आले आहे. खासदार कुमार केतकर यांच्याकडे माध्यम समितीची धुरा सोपवली आहे. प्रसिद्धीची जबाबदारी रत्नाकर महाजन यांच्याकडे तर लोकसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांना समन्वय समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. प्रियांका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून नियुक्ती काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली. फेब्रुवारी महिन्यात प्रियांका गांधी पदभार स्वीकारणार आहेत.  प्रियांका गांधींच्या एन्ट्रीमुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मोठी खेळी केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर पश्चिम उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रियांका गांधी यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासाठी प्रचार करायच्या. मात्र, त्यांच्याकडे पक्षाचं कोणतंही पद नव्हतं. त्यानंतर, गेल्या काही वर्षांपासून प्रियांका गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवण्याची मागणी केली जात होती. ‘प्रियांका लाओ, काँग्रेस बचाओ’, असे पोस्टरही काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावले होते.
प्रियांका गांधींविषयी माहित नसलेल्या दहा गोष्टी
मागील अनेक वर्षांपासून प्रियांका गांधींनी राजकारणात प्रवेश करावा, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते करत होते. ती मागणी पूर्ण झाली आहे. प्रियांका गांधी आतापर्यंत रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघातच मर्यादित होत्या. त्या केवळ आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल गांधी यांच्या प्रचारात दिसत होत्या. मात्र आता त्या अधिकृतरित्या पक्षात सक्रीय होणार आहेत. 2019 ची लोकसभा निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे आणि त्यात उत्तर प्रदेशची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. उत्तर प्रदेशात सपा आणि बसपाने एकत्र येत, काँग्रेसला आघाडीतून बाहेर ठेवल्याने सगळं समीकरण बदललं आहे. संबंधित बातम्या
प्रियांका गांधींविषयी माहित नसलेल्या दहा गोष्टी
काँग्रेसची मोठी खेळी, प्रियांका गांधींवर सरचिटणीसपदाची जबाबदारी
प्रियांका गांधी उत्तर प्रदेशात 'गेम चेंजर' ठरणार?
प्रियांका गांधी राहुल गांधींना पर्याय नव्हे तर पूरक ठरणार?
प्रियांका गांधी या 21 व्या शतकातील इंदिरा गांधी : सुशीलकुमार शिंदे

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff :  टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! जशास तसे उत्तर देऊ, हे करणाऱ्यांना ठेचून काढू : एकनाथ शिंदे
Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! जशास तसे उत्तर देऊ, हे करणाऱ्यांना ठेचून काढू : एकनाथ शिंदे
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन, चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश  
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget