Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan: नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशिकमध्ये सुरुवात झाली आहे. साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या उपस्थितीत सारस्वतांचा मेळा तीन दिवस चालला. संमेलन आणि राजकारण होणं हे सूत्र नेहमीच ठरलेलं असतं. यंदाही संमेलनावरुन भरपूर राजकारण झालं. त्यातच कोरोनाचं संटक, दोन दिवस झालेला पाऊस, प्रकृतीच्या कारणामुळे संमेलनाध्यक्ष आणि मुख्यमंत्री संमेलनाला हजर न राहणे ,निमंत्रण पत्रिकेत नाव न टाकल्याच्या कारणावरून भाजपच्या नेत्यांची संमेलनाकडे पाठ आणि आज समारोपाच्या दिवशीच सकाळी-सकाळी कोरोनाचे दोन रूग्ण सापडले. शिवाय दुपारी जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून झालेली शाईफेक अशा अनेक वादासह आज सायंकाळी या संमेलनाची सांगता झाली.  


कोरोनाच्या संकटाची टांगती तलवार असताना संमेलन होणार की नाही इथपासून झालेली सुरूवात आणि शेवटी शाई फेकीचा झालेला प्रकार. यामुळे यंदाचं साहित्य संमेलन चर्चेचा विषय ठरलं. या दोन्ही घटनांमध्ये अनेक घटना घडत होत्या. असं असलं तरी महाराष्ट्रापासून देशभरातील साहित्यिकांसह साहित्य रसिकांनी संमेलनाला हजेरी लावली. त्यामुळे तीनही दिवस संमेलनस्थळी गर्दी पाहायला मिळाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या ओरोग्य यंत्रणेने चांगली तयारी केली होती. प्रवेशद्वारावरच आटीपीसीआर चाचणी करून अहवाल निगेटिव्ह आला तरच संमेलनाला प्रवेश देण्यात येत होता.  


शेवटच्या दिवशी खळबळ


कोरोनाच्या सावटामुळे यंदाचे संमेलन होणार की नाही यावरच प्रथम शंका उपस्थित करण्यात येत होती. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रूग्णांच्या संखेत घट होत असल्याचे लक्षात आल्यानंतर संमेलन घेण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर त्याची तारीख पक्की करण्यात आली. नंतर जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. परंतु,प्रकृतीच्या कारणास्तव जयंत नारळीकर संमेलनाला उपस्थित राहू शकले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही शस्त्रक्रीया झाल्यामुळे तेही संमेलनाला उपस्थित राहू शकले नाहीत. याबरोबरच संमेलन पत्रिकेत नाव न टाकण्यात आल्याच्या नाराजीवरून भाजप नेत्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही संमेलनाला उवस्थित राहिले नाहीत. अशा घडामोडीनंतर संमेलनाला सुरूवात झाली. परंतु, पहिल्याच दिवशी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे थोडीसी तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. संमेलनाचा दुसरा दिवस सुरळीत गेला असतानाच आज समारोपाच्या दिवशी सकाळीच तपासणी करत असताना प्रवेशद्वारावर पुण्याहून आलेले दोन प्रकाशक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. ही घटना ताजी आहे तोपर्यंत दुपारी गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडकडून शाई फेकण्यात आली.  
  
दरम्यान, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर (Dr Jayant Narlikar) संमेलनाला उपस्थित राहू न शकल्यामुळे संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. संमेलनाच्या सुरुवातीला लेझीम खेळत दिंडी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या साहित्यिकांचा सहभाग मिळाला.


साहित्य संमेलनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून साहित्य रसिक, साहित्यिक, कलाकार दाखल झाले होते. पहिल्या दिवशी सकाळी संमेलनाला सुरूवात होण्यापूर्वी सोलापूर येथील कलाकारांनी संत गाडगे महाराजांचा वेश परिधान करून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या बाहेर साफसफाई केली.  त्यानंतर कुसुमाग्रजांचे निवासस्थान असलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानपासून ग्रंथ दिंडीला सुरुवात झाली, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, महापौर निवासस्थान रामायण बंगला, टिळकवाडी सिग्नल, सीबीएस चौक- आंबेडकर पुतळा, शिवाजीरोड मार्गे नेहरू गार्डन मार्गे निघून सार्वजनिक वाचनालय इथे दिंडीचा समारोप झाला. दिंडीत शाळकरी मुलं, ढोल पथक, वारकरी सहभागी झाले होते, दिंडी मार्गावर रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत करण्यात आले. स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह साहित्य रसिक, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, लोकहितवादी मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. 



ग्रंथ दिंडीनंतर मंत्री सुभाष देसाई आणि स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, कौटिकराव ठाले पाटील यांच्या उपस्थितीत अभिजात मराठी दालनाचे उद्घाटन करण्यात आले. कौतिक ठाले पाटील आणि छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सुभाष देसाई, छगन भुजबळ यांच्यासह साहित्यिकांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवले. हे या सर्वांच्या हस्ते हे पत्र पत्रपेटीत टाकण्यात आले.  


साहित्य संमेलनात झालेले ठराव
 साहित्य, कला, संस्कृती या क्षेत्रात महान बाबासाहेब पुरंदरे, कॉंग्रेसचे खासदार दिवंगत राजीव सातव यांच्यासह कोरोना काळात निधन झालेल्यांना आदरांजली  
 काही वर्षे सततच्या नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकरी कुटुंब अनेक समस्यांनी ग्रासले आहे
आम्ही सर्व साहित्य प्रेमी शेतकरी यांच्यां कुटुंबीयांसाठी कार्यरत राहू
 मराठीला अभिजात दर्जा  तातडीने देण्यात यावा
 मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत आहेत, त्या बंद पडू नये यासाठी शासनाची भूमिका उदासीन दिसते, शासनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी मागणी
 कर्नाटक सरकार मराठी भाषिकांची गळचेपी करत आहेत, या बंधनाचा तीव्र निषेध
ब्रुहन महाराष्ट्रा मधील मराठी भाषिकासाठी वेगळा अधिकारी नेमावा
महाराष्ट्रा बाहेर महाराष्ट्र परिचय केंद्र पुनरुज्जीवन करावे जिथे नाही तिथे केंद्र उभारावे
राज्यात 60 हून अधिक बोली भाषा आहे, त्या लोप पावत आहेत त्यांना पुनर्जीवीत करावा 
हिंदी भाषेत आणि भारत सरकाच्या कार्यालयात 'ळ: या शब्दाचा उल्लेख करवा


संबंधित बातम्या


Video : धक्कादायक: पुस्तकाचं नाव माहित नसतानाही संभाजी ब्रिगेडकडून गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक