एक्स्प्लोर

विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते कॉ.माधवराव गायकवाड यांचे निधन

कॉ.गायकवाड हे राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांचे नेते होते. या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे लढा उभारला. संघर्ष करून या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. 1960 ते 1962 दोन वर्षे ते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते.

मनमाड: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे माजी राज्य सचिव आणि विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते व  माजी आमदार कॉ.माधवराव गायकवाड यांचे दीर्घ आजाराने आज सकाळी निधन झाले. ते 95 वर्षाचे होते. त्यांनी नमाडला राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. कॉ.गायकवाड हे राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांचे नेते होते. या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे लढा उभारला. संघर्ष करून या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. 1960 ते 1962 दोन वर्षे ते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर 1974 साली राज्यात प्रथमच जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक झाली होती. त्यात कॉ. माधवराव गायकवाड यांना मनमाड नगर परिषदेवर जनतेतून थेट नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला. 1974 ते 1981 पर्यंत ते नगराध्यक्ष होते. 1985 साली नांदगाव-मनमाड विधानसभा मतदार संघातून निवडणूक जिंकून ते आमदार झाले. 1985 ते 1990 पर्यंत त्यांनी आमदारकी भूषवली. त्यांच्या कार्यकाळात नांदगाव तालुका हा भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा बालेकिल्ला मानला जात होता. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मनमाडसह संपूर्ण नांदगाव तालुक्यातील जनतेत शोककळा पसरली आहे. उद्या सकाळी त्यांच्यावर अंत्यसंकार करण्यात येणार आहेत. माधवराव गायकवाड यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि कम्युनिस्ट नेते माधवराव गायकवाड यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. माधवराव गायकवाड यांची शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हिताशी अखेरपर्यंत बांधिलकी होती. विशेषतः प्रदीर्घ काळ चाललेल्या खंडकरी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे त्यांनी यशस्वी नेतृत्व केले होते. कष्टकरी-शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक लढे उभारून जीवनभर संघर्ष केला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. राज्यातील कम्युनिस्ट नेत्यांच्या पहिल्या पिढीतील ते एक प्रमुख नेते होते, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Solapur News: सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Embed widget