रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी 12 ऑगस्टनंतर कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या एसटी आणि खाजगी बसेसकडे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी पाठ फिरवली आहे. 12 ऑगस्टपर्यंत ई-पास काढून अनेकजण खाजगी बस, त्यासोबतच एसटी बस सुरु झाल्यानंतर एसटीने प्रवास करत कोकणात पोहचले. मात्र, 13 ऑगस्टपासून कोकणात जायला कोरोना टेस्ट करावी लागत आहे. कोरोना टेस्ट नेगटीव्ह आल्यानंतरच ई-पास प्रवशाला मिळणार असून त्यानंतर त्याला आरक्षण करून कोकणात गणेशोत्सवासाठी जाता येणार आहे. त्यामुळे 13 ऑगस्टपासून 21 ऑगस्टपर्यंत एसटीमध्ये 5 प्रवाशांचा तर खाजगी बसमध्ये शून्य प्रवाशांचं आरक्षण झालं आहे.
कोरोना टेस्ट बंधनकारक असल्याने त्यासाठी खर्च करावा लागणार असून कुटुंब कोकणात जाताना हा खर्च वाढून त्यात एसटी बस किंवा खाजगी बस तिकिटांचा खर्च यामुळे आर्थिक भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत असल्याने प्रवासी कोकणात जाण्याचे नियोजन रद्द करताना पाहायला मिळत आहेत. 12 ऑगस्टपर्यंत खाजगी बसमध्ये चांगले आरक्षण होत असताना 13 ऑगस्टपासून एकही आरक्षण कोकणासाठी झाले नसल्याने सगळ्या गाड्या एका जागी उभ्या असून या नियमामुळे मोठा फटका बस मालकांनासुद्धा सहन करावा लागत असल्याचे मत, मुंबई
बस मालक संघटनेचे अध्यक्ष हर्ष कोटक यांनी मांडले आहे.
दुसरीकडे एसटीने जेव्हा कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सेवा सुरु केली. तेव्हा ई-पास काढून कोकणात जाणाऱ्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. मात्र, 21 ऑगस्टपर्यत जरी आता या बसेस सोडण्यात आल्या आहेत. पण त्याचा फायदा प्रवाशांना घेताना अटी, नियम, शर्तींचे पालन करताना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे काल एकही एसटी बस ही कोकणाकडे प्रवशाविना जाऊ शकलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी; कोकणात जाणाऱ्यांसाठी 'या' दिवसापासून धावणार कोकण रेल्वे!
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याबाबत निर्णय