गडचिरोली : नक्षल्यांचा छुप्या हल्ल्यात एक जवान शहीद झाली झाल्याची घटना आज घडली.  अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त असलेल्या भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्रात ही घडली आहे.  दुष्यांत नंदेश्वर असं शहीद जवानाचं नाव आहे. पोलीस जवान पोलीस मदत केंद्राच्या बाहेर दुकानात काही सामान घेण्यासाठी गेल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याच दरम्यान नक्षल्याच्या अॅक्शन टीमने हा हल्ला केला आहे.


अचानक झालेल्या हल्ल्यात दुष्यांत नंदेश्वर हे जवान शहीद झाले. सोबत असलेला जवान गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे. दुष्यांत नंदेश्वर हे गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी आहे तर दिनेश भोसले हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.

कोटी पोलीस मदत केंद्र हे महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेवर आहे. घनदाट जंगल, डोंगर, अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग आहे. त्यामुळे ह्या भागात नक्षल्यांच्या हालचाली सुरू असतात. त्यामुळे नेहमी सतर्क राहणे आवश्यक असतं.