मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांना दरवर्षी प्रमाणे टोलमध्ये सूट मिळणार आहे. कोकणात जाणाऱ्या नागरिकांना गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस अगोदर व परतीच्या प्रवासात दोन दिवस टोलमधून सवलत मिळणार आहे.


टोलमध्ये सवलत मिळवण्यासाठी नागरिकांनी स्थानिक पोलीस स्टेशन, आरटीओ कार्यालयात आपला वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव व प्रवास तारीख नमूद केल्यास तात्काळ टोल माफी स्टिकर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.


पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसी, आरटीओ तसेच पोलीस गणेशोत्सवादरम्यान एकमेकांत समन्वय ठेवून गणेशोत्सव साजरा करण्याकरिता गावी जाणाऱ्या नागरिकांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यासंदर्भातील सूचना बैठकीदरम्यान देण्यात आल्या आहेत.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासाच्या अगोदर राज्य सरकारच्या नियमांनुसार कोरोना चाचणी करणे व ई पास काढणे बंधनकारक असणार आहे. याप्रसंगी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, सा. बांधकाम व एमएसआरडीसी विभागातील वरिष्ठ अधिकारी, कोकण विभागातील सर्व पोलीस आयुक्त, सर्व मनपा आयुक्त उपस्थित होते.


Konkan Ganesh Utsav | गणेशोत्सवासाठी कोकणात जायला ट्रेन का नाही? घूमजाव करणाऱ्या सरकारवर भाजपची टीका