देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस, ठाणे, पालघर, नंदुरबारसह नाशिक जिल्ह्यातही पाऊस, तर पुणे, सातारा, कोल्हापुरात अति मुसळधार पावसाचा इशारा


2. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास कोणाकडे सीबीआयकडे की मुंबई पोलिसांकडे आज फैसला होण्याची शक्यता, सीबीआय तपासासाठी सोशल मीडियावर जोरदार मोहीम


3. शरद पवार यांनी फटकारल्यानंतर पार्थ पवार सिल्वर ओकवर, सव्वा दोन तास शरद पवार यांच्यासोबत चर्चा, तर मंत्रालयात सुप्रिया सुळेंकडून अजित पवार यांची भेट


4. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात आज निर्णय अपेक्षित, परीक्षा घेणं महत्त्वाचं असल्याचं केंद्राची भूमिका, सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर


5. आदित्य ठाकरे अध्यक्ष असलेल्या पद्म समितीवर आणखी एक समिती नेमण्याची शक्यता, राष्ट्रवादीचा आग्रह असल्याची सुत्रांची माहिती


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 14 ऑगस्ट 2020 | शुक्रवार | ABP Majha



6. राज्यात काल 11 हजारांहून अधिक नवे कोरोनाग्रस्त, तर 413 रुग्णांचा मृत्यू, कल्याण-डोंबिवलीमध्ये 330 तर नवी मुंबईत 317 रुग्णांची भर


7. जिम, वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरून मनसेच्या सुरात भाजपचा सुर, तत्काळ जिम सुरु करण्याची देवेंद्र फडणवीसांची मागणी, तर वीज बिलावरून भाजप भिक मांगो आंदोलन करणार


8. मुंबईसाठी महापालिकेचं 'मिशन सेव्ह लाईव्ह्ज', मृत्यूदर 5.5 टक्क्यांवरून तीन टक्क्यांवर आणण्याचं उद्दिष्ट, वृद्ध कोरोना रुग्णांवर अधिक लक्ष ठेवणार


9. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांचा घटस्फोटासाठी फॅमिली कोर्टात दावा, दानवे आणि मुलगी संजना यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा जाधवांकडून आरोप


10. गाड्या सोडायला आम्ही तयार मात्र, तूर्तास गाड्या सोडू नका अशी राज्य सरकारचे आदेश, राज्य सरकारच परवानगी देत नसल्याचं मध्य रेल्वेकडून जाहीर