Mumbai: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी जुलै 2020 मध्ये 10 डीसीपी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यानंतर अनेक अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पदभार स्वीकारला. परंतु, अचानक आदेश रद्द करण्यात आले. याबाबत ईडीनं मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव सिताराम कुंटे (Sitaram Kunte) यांच्याकडं विचारणा केली. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडं संबंधित बदल्यांबाबत तक्रारी आल्या होत्या, असं त्यांनी म्हटलंय. त्यांनी मला पोलीस आयुक्तांना यथास्थिती ठेवण्यास सांगितलं. त्यानंतर मी पोलीस आयुक्तांना फोन केला आणि व्हॉट्सअॅपद्वारे याबाबत माहिती दिली. 


दरम्यान,10 डीसीपींच्या सुधारित बदलीचे आदेश जारी करण्यासाठी स्वीकारलेले निकष माहित नाहीत. कारण, ते पोलीस आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर जारी केले होते. कदाचित पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना कळवले असेल आणि त्यांच्याकडून पुढील सूचना मिळाल्या असतील. पण त्या सूचना काय होत्या?  मला माहीत नाही, असं कुंटे यांनी ईडीला सांगितलंय. 


बदल्यांबाबत आतापर्यंत 28 बैठक
पोलीस बदल्यांबाबत आतापर्यंत 28 बैठक पार पडल्या आहेत. तसेच या बैठकीत 27 बदलीचे आदेश काढण्यात आले आहे. मात्र, या यादीतील एका बैठकतील आदेश काही कारणास्तव जारी करण्यात आला नाही. या सर्व बैठकीत अनिल देशमुख उपस्थित होते, अशी माहिती कुंटे यांनी दिलीय.


अनधिकृत यादीबाबत सिताराम कुंटे यांची महत्वाची माहिती
 ज्या यादींची नोंद नाही, तुम्ही त्या अनधिकृत यादी अनिल देशमुख यांच्याकडून का घ्यायचा? असा प्रश्न ईडीनं सिताराम कुंटे यांना विचारला. यावर सिताराम कुंटे म्हणाले की, मी अनिल देशमुखांचा सर्बोर्डिनेट होतो, मला त्यांना नकार देता येत नव्हता. दरम्यान, अनिल देशमुख यांनी मला अशी अनधिकृत यादी का दिली नाही, हे फक्त तेच चांगल्या पद्धतीनं सांगू शकतील, असं कुंटे म्हटलं. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha