लातूर : नैसर्गीक आणि कृत्रीम संकटांना सतत सामोरे जावे लागणाऱ्या शेतकऱ्याला कधी-कधी चोरीसारख्या मानवी संकटांनाही सामोरे जावे लागते. अशीच एक घटाना लातूरमध्ये धडली आहे. शेतकऱ्यांचे तब्बत 17 लाख रूपयांचे सोयाबीन चोरीला गेले होते. परंतु, लातूर एमआईडीसी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीला गेलेले सोयाबीन शेतकऱ्यांना परत मिळाले आहे. 


लातूर जिल्ह्यातील खंडापूर शिवारातील बालाजी वेयरहाउस येथे काल 17 लाख रुपयांच्या सोयाबीनची चोरी झाली. चोरटे 550 कट्टे सोयाबीन दोन ट्रकमध्ये टाकून पसार झाले होते. याबाबत तक्रार केल्यानंतर लातूर एमआईडीसी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. सोयाबीन चोरणाऱ्या चोरांबद्दल पोलिसांनी गुप्त माहिती मिळाली. त्यावरून माहिती काढत पोलिसांनी 550 कट्टे सोयाबीन आणि दोन ट्रक जप्त केले. 


पोलिसांनी चोरी झाल्यापासून अवघ्या चोवीस तासात कारवाई करत चोरीला गेलेलं सोयाबीन शेतकऱ्यांना परत मिळवून दिले. याबद्दल शेतकऱ्यांकडून पोलिसांचे आभार मानण्यात आले आहेत. पोलिसांच्या या कामगिरीचे संपूर्ण लातूर जिल्ह्यातून कौतुक होत आहे. चोरी गेलेल्या सोयाबीनचा पंचनामा करून ते शेतकऱ्यांना परत केले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली. सोयबीनचे चोरी करणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


सोयाबीनची चोरी करणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून 24 तासातच चोरीचा माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. लातूर भागामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे वेरहाऊस आहेत. त्यामुळे चोरट्यांनी यातील एक सोयाबीनचा वेरहाऊस हेरत ही चोरी केली होती, अशी माहिती शहर पोलिस उपअधीक्षक जितेंद्र जगदाळे यांनी दिली. 


महत्वाच्या बातम्या