Gold Price today : तुम्हाला जर सोने खरेदी करायचे असेल, तर ही सुवर्णसंधी आहे. खरंतर, गेल्या दोन दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर घसरत आहेत. काल सोन्याच्या दरात 0.25 टक्क्यांची घसरण झाली होती, तर मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) आज 0.07 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. याबरोबरच आज चांदीचा दर 0.23 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.


जाणून घ्या काय आहेत सोन्या-चांदीचे दर  :
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज एप्रिलमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा दर 0.07 टक्क्यांनी घसरून 48,049 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. दुसरीकडे आजच्या व्यवहारात चांदी 0.23 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा दर 61,362 रुपये आहे.


गेल्या वर्षी 2020 मध्ये,  याच दरम्यान, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज डिसेंबर फ्युचर्स एमसीएक्सवर सोने 47,792 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. म्हणजेच, सोने अजूनही सुमारे 8,400 रुपयांनी स्वस्त होत आहे.


मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर :


तुम्ही या दरांनी फार सोप्या पद्धतीने घरबसल्या जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्यायचा आहे. यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जो मेसेज येईल त्यामधून तुम्ही सोन्या-चांदीचे आजचे दर जाणू शकता. 


अशा पद्धतीने चेक करू शकता सोन्याची शुद्धता :


जर तुम्हाला सोन्याची शुद्धता चेक करायची आहे. तर यासाठी सरकारतर्फे एका अॅपची सुविधा करण्यात आली आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून तुम्ही सोन्याची (Gold) शुद्धता (Purity) चेक करू शकता. इतकेच नाही, तर या अॅपच्या माध्यमातून तुम्ही संबंधित कोणतीही तक्रारदेखील नोंदवू शकता.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha