एक्स्प्लोर

नोटांअभावी उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांची तक्रार करा : मुख्यमंत्री

मुंबई : खाजगी रुग्णालयांनी नवीन चलनासाठी आग्रही न राहता रुग्णांना तातडीने उपचार द्यावेत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा दिले आहेत. उपचार नाकारल्यास 104 आणि 108 या क्रमांकावर तक्रार करावी, असं आवाहन केलं आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारकडून तक्रार निवारण करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून आतापर्यंत तिचा 320 रुग्णांनी लाभ घेतला आहे. केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याने खाजगी रुग्णालयात तातडीच्या उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना नवीन चलनाअभावी अडचणी येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी शासकीय यंत्रणेला कार्यवाहीचे आदेश दिले होते. शासकीय यंत्रणेकडून सर्व संबंधित रुग्णालयांना उपचार करण्यासंबंधी सुचित करण्यात आलं आहे. रुग्णांकडे नवे चलन उपलब्ध नसल्यास त्याच्या सोयीने शुल्क स्वीकारण्याबाबत रुग्णालयांनी सामंजस्याने तोडगा काढावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. इथे तक्रार करा असहकार्य करणाऱ्या रुग्णालयाची रुग्ण तक्रार करु शकणार आहेत. पालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालयांसाठी संबंधित पालिकेकडे, पालिकेव्यतिरिक्त इतर शहरी भागासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे आणि ग्रामीण भागातील खाजगी रुग्णालयांबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येऊ शकेल. या स्तरावर तक्रारीचे निवारण न झाल्यास त्या विभागाच्या उपसंचालकांकडे दाद मागता येऊ शकेल. त्यानंतरही कार्यवाही न झाल्यास आरोग्य सहसंचालकांकडे तक्रार करता येईल. 104 आणि 108 या टोल फ्री क्रमांकावर संबंधितांना तक्रार करता येणार आहे. या तक्रारीचा तपशील जाणून घेऊन शासकीय यंत्रणेकडून त्यानुसार कारवाई करण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Dombivli: 'मला मारू नका...', मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिवाल डॉक्टरचाय मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
Pune Moshi Building Collapse: 64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?
64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?
Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेला तब्बल 64 तास उलटूनही बचावकार्य अद्याप सुरूच; अत्याधुनिक डिमोलीशन एक्सकॅव्हेटर मशीन घटनास्थळी दाखल, मुख्यमंत्र्यांकडूनही दुर्घटनेचा आढावा
मोशी दुर्घटनेला तब्बल 64 तास उलटूनही बचावकार्य अद्याप सुरूच; अत्याधुनिक डिमोलीशन एक्सकॅव्हेटर मशीन घटनास्थळी दाखल, मुख्यमंत्र्यांकडूनही दुर्घटनेचा आढावा

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli: 'मला मारू नका...', मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिवाल डॉक्टरचाय मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Embed widget