एक्स्प्लोर

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरुद्ध तक्रार

धनराज घोगरे यांनी या लॅपटॉप मधील माहिती चोरून ती चित्रा वाघ यांना पुरवल्याचा आरोप आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्या विरोधात देखील संगीता चव्हाण यांनी तक्रार दिली आहे.

पुणे : पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर तीचा लॅपटॉप भारतीय जनता पक्षाचे वानवडी भागातील नगरसेवक धनराज घोगरे यांनी गायब केल्याचा आरोप करण्यात आलाय. धनराज घोगरे यांनी या लॅपटॉप मधील माहिती चोरून ती चित्रा वाघ यांना पुरवल्याचा आरोप आहे.  तशी तक्रार शिवसेनेच्या बीड जिल्हा महिला आघाडी प्रमुख संगीता चव्हाण यांनी बीड पोलिसांकडे दिली आहे.

पूजा चव्हाणचा पुण्यातील वानवडी भागातील इमारतीवरुन पडून मृत्यू झाला त्या इमारतीच्या समोरच धनराज घोगरेचे घर आहे. पूजा जेव्हा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली पडली तेव्हा तीला रुग्णालयात दाखल करणाऱ्यांमध्ये अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांच्याबरोबर धनराज घोगरे हे देखील होते. मात्र पूजाच्या मृत्यूनंतर अरुण राठोड आणि विलास चव्हाण जसे गायब झाले तसा पूजाचा लॅपटॉप देखील गायब करण्यात आला. हा लॅपटॉप जेव्हा पूजावर उपचार करण्याचा प्रयत्न सुरू होता तेव्हा धनराज घोगरे यांनी माहिती चोरल्याचा आरोप आहे.

धनराज घोगरेने या लॅपटॉप मधील माहिती चोरून ती चित्रा वाघ यांना पुरवल्याचा आरोप आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्या विरोधात देखील संगीता चव्हाण यांनी तक्रार दिलीय. या लॅपटॉपमधून अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. पुणे पोलिसांनी देखील पूजाचा लॅपटॉप चोरीला गेल्याचा आणि आपण त्याचा शोध घेत असल्याच म्हटलय.

काय आहे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण?

मूळची बीडमधल्या परळीची असलेल्या पूजा चव्हाण या 22 वर्षाच्या मुलीचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. इंग्लिश स्पीकिंगच्या क्लाससाठी ती पुण्यात आली होती. तिने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय आहे. तिच्या आत्महत्येनंतर संजय राठोड यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने तक्रार दाखल केली होती. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली. त्यातच पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांच्या एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिप समोर आल्या. त्यानंतर या ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचाच असल्याचा दावा करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

#Banjara चित्रा वाघ, देवेंद्र फडणवीसांवर अदखलपात्र गुन्हा, बंजारा समाजाची बदनामी केल्याचा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान, शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता
Maharashtra Live blog updates: विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान, शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता
Nagpur MLC Election 2026: नागपुरतील बंडखोरी शमवण्यात यश, पण अनिल सोलेंच्या मतपत्रिकेवर नावाचा भाजपला फटका बसणार? काँग्रेसच्या अभिजीत वंजारींकडून दणदणीत विजयाचा दावा, म्हणाले..
नागपुरतील बंडखोरी शमवण्यात यश, पण अनिल सोलेंच्या मतपत्रिकेवर नावाचा भाजपला फटका बसणार? काँग्रेसच्या अभिजीत वंजारींकडून दणदणीत विजयाचा दावा, म्हणाले..
Nitesh Karale: नितेश कराळेंची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी, कारवाईनंतर मास्तर ओक्साबोक्शी रडले; नंतर थेट आक्रमक इशारा देत म्हणाले, शरद पवारांविषयी आदर, पण...
नितेश कराळेंची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी, कारवाईनंतर मास्तर ओक्साबोक्शी रडले; नंतर थेट आक्रमक इशारा देत म्हणाले, शरद पवारांविषयी आदर, पण...
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: शिक्षक-पदवीधर निवडणुकीच्या पाच जागांसाठी आज मतदान, 182 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला, वाचा सर्व अपडेट
शिक्षक-पदवीधर निवडणुकीच्या पाच जागांसाठी आज मतदान, 182 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला, वाचा सर्व अपडेट

व्हिडीओ

Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट, मुंबई पोलिसांनी सुरतमधून रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतली, आणखी तीन जण अटकेत
टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट, मुंबई पोलिसांनी सुरतमधून रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतली, आणखी तीन जण अटकेत
Dengue Death in Pune : आधी ताप अन् पोटदुखीचा त्रास; श्वास घेता येईना, प्लेटलेट्सची संख्या घसरली, पुण्यात डेंगीचा पहिला बळी; आठ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
आधी ताप अन् पोटदुखीचा त्रास; श्वास घेता येईना, प्लेटलेट्सची संख्या घसरली, पुण्यात डेंगीचा पहिला बळी; आठ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
Nitesh Karale: नितेश कराळेंची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी, कारवाईनंतर मास्तर ओक्साबोक्शी रडले; नंतर थेट आक्रमक इशारा देत म्हणाले, शरद पवारांविषयी आदर, पण...
नितेश कराळेंची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी, कारवाईनंतर मास्तर ओक्साबोक्शी रडले; नंतर थेट आक्रमक इशारा देत म्हणाले, शरद पवारांविषयी आदर, पण...
Chhatrapati Sambhaji nagar Crime Bunty Dixit Case: छत्रपती संभाजीनगरमधील फेसबुक किंग बंटी दीक्षितचा भयानक शेवट, मित्रानेच संपवलं, लोखंडी रॉडने चेहरा बिघडवून टाकला
छत्रपती संभाजीनगरमधील फेसबुक किंग बंटी दीक्षितचा भयानक शेवट, मित्रानेच संपवलं, लोखंडी रॉडने चेहरा बिघडवून टाकला
Maharashtra Live blog updates: विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान, शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता
Maharashtra Live blog updates: विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान, शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता
Sri Lanka vs England: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Video: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Raju Shetti: 'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
Embed widget