एक्स्प्लोर

College Reopen : कॉलेज कॅम्पस गजबजणार, राज्यात आजपासून महाविद्यालये सुरू

महाविद्यालये आणि विद्यापीठात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे.

मुंबई : कोरोनामुळे राज्यासह देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. त्यामुळे महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्याने राज्यातील शाळांपाठोपाठ महाविद्यालये आणि विद्यापीठे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे.

आजपासून राज्यभरातील कॉलेज सुरु होत आहेत. मात्र अनेक कॉलेजेसच्या एसओपी जाहीर होत नसल्यानं विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण होतं. मात्र आज औरंगाबाद आणि पुणे विद्यापीठानं संबंधित महाविद्यालयांच्या प्रशासनाला आदेश जारी केले आहेत. याशिवाय राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये  आजपासून सुरू होणार आहे.  20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरु करण्याबाबत राज्य सरकारनं हिरवा कंदील दिला आहे. मात्र पुणे, औरंगाबाद  विद्यापीठ, आणि कृषी विद्यापीठाकडून कालपर्यंत त्यासंदर्भातले आदेश महाविद्यालयांना मिळाले नव्हते. मात्र आज आदेश जारी केल्यानं विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर झाला आहे. 

काय आहेत नियम? 

  • कोरोना संसर्ग कमी झालेल्या ठिकाणी 50 टक्केपेक्षा जास्त क्षमतेने महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 
  • यात महत्वाची सूचना अशी की विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेलं असणे आवश्यक आहे. अशा विद्यार्थ्यांना प्राधान्याने महाविद्यात बोलावलं पाहिजे.
  • कोरोना लसीकरण पूर्ण झालेले नसतील तर विद्यापीठ, महाविद्यालयाने पुढाकार घेऊन जिथल्या स्थानिक प्रशासनाशी चर्चा करुन विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय परिसरातच लसीकरण राबवले पाहिजे. 
  • ज्या परिसरात कोरोना वाढण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी स्थानिक प्रसासनाशी चर्चा करुनच कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घ्यायचा आहे.
  • तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थिती पाहून नियमावली बदलण्याचा अधिकारी आम्ही विद्यापीठ, महाविद्यालयांना दिलं आहे. 
  • परिस्थितीनुसार प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळी नियमावली तयार करायची आहे.
  • जे विद्यार्थी प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहू शकत नाही. अशा विद्यार्थ्यांची ऑनलाईन सोय महाविद्यालयांनी करुन द्यायची आहे. 
  • टप्प्याटप्प्याने वसतीगृह सुरू करण्यास आम्ही परवानगी देण्यात आली आहे.
  • शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 100 टक्के लसीकरण करण्याच्या सूचना आम्ही विद्यापीठ आणि महाविद्यालयांना दिली आहे.
  • ज्यांनी दोन डोस घेतले आहेत अशा विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि पालकांनी विनंती आहे की कोरोना नियम पाळणे बंधनकारक आहे.

पुण्यातील महाविद्यालये सुरू होण्याची साशंकताच

राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देखील आजपासून महाविद्यालये सुरु करण्याच्या सूचना दिल्यात.  मात्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे,  अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील किती महाविद्यालये आज लगेच सुरु होतील याबद्दल शंका आहे.  कारण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ऐनवेळेस महाविद्यालयांना काम सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  त्याचबरोबर विद्यापीठाचे यावर्षीचे पहिले शैक्षणिक सत्र आज म्हणजे 20 ऑक्टोबरलाच संपत आहे.  त्यामुळे उद्या लगेच पुणे जिल्ह्यातील किती महाविद्यालये सुरु होतील याबद्दल शंकाच आहे.

महत्त्वाच्या बातम्या

शेगाव ते नागपूर थेट ट्रॅक्टर मोर्चा, शेतकऱ्यांसाठी रोहित पवार मैदानात, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, सरकारवर हल्लाबोल  
शेगाव ते नागपूर थेट ट्रॅक्टर मोर्चा, शेतकऱ्यांसाठी रोहित पवार मैदानात, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, सरकारवर हल्लाबोल  
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
मोठी बातमी! कोयनेचं पाणी भागवणार मुंबईकरांची तहान, तब्बल 67 TMC नवीन पाणीसाठी उपलब्ध होणार, पुढच्या 50 वर्षाचं नियोजन करणार, नेमका काय आहे निर्णय?
मोठी बातमी! कोयनेचं पाणी भागवणार मुंबईकरांची तहान, तब्बल 67 TMC नवीन पाणीसाठी उपलब्ध होणार, पुढच्या 50 वर्षाचं नियोजन करणार, नेमका काय आहे निर्णय?

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Night Shift Heart Health Risk : नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Sujay Vikhe Patil : शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
PM Modi Speech :
"1,000 वर्षांच्या गुलामगिरीनंतर पहिल्यांदाच 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर"; गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदींचा दावा
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
Ajinkya Rahane : आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर

Embed widget