Nashik Cold Weather : नाशिक परिसरात गुलाबी थंडीचा अनुभव आता नाशिककरांना जाणवू लागला आहे. नाशिकमध्ये संध्याकाळ नंतर आणि पहाटेच्या सुमारास थंडी जाणवत असल्याचे दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून किमान तापमानात वेगाने घसरण होऊ लागली असून थंडी वाढू लागली आहे. बुधवारी नाशिकमध्ये 14.6 सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवण्यात आले.


नाशिक शहरासह जिल्ह्यात मागील आठवड्यांपर्यंत परतीच्या पावसाची हजेरी कायम होती. शनिवारी शहरात पाच मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यानंतर अवघ्या तीन दिवसात शहर आणि परिसरात वातावरण वेगाने बदलण्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे. अचानकपणे थंडीने उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. आकाश निरभ्र राहत असून पहाटे धुके पडू लागले आहे. शनिवारी किमान तापमान 21 अंश होते. मात्र एका दिवसात पारा थेट रविवारी 15 अंशापर्यंत घसरला. 


अवघ्या 24 तासांत एवढं तापमान घसरण्याची ही पहिलीच वेळ असल्याची शक्यता आहे. मंगळवारी 13.48 इतके तापमान नोंदवले गेले तर बुधवारी 14.6 इतके तापमान नोंदवण्यात आले. हवामानातील आद्रतेचे प्रमाणही कमी झाले आहे. थंडीशी जाऊन नाशिककरांना लागली आहे. अचानकपणे दोन दिवसात वातावरणात झालेला कमालीचा बदल नाशिककर अनुभवत आहेत. थंडीचे आगमन झाले असून पारा वेगाने घसरू लागला आहे. यामुळे पुन्हा एकदा अडगळीत ठेवलेले उद्धार कपडे बाहेर काढण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. 


सकाळी वेळ संध्याकाळी वातावरणात थंडी जाणवत असल्याने पहाटेपासून यांचा दिनक्रम सुरू होतो. अशा विक्रेत्यांकडून अथवा नोकरदारांकडून सध्या उबदार कपड्यांच्या वापराला प्राधान्य दिले जात आहे. ऊन पडल्यानंतर वातावरणातील गारवा नाहीसा होत आहे. किमान तापमानाचा पारा अद्याप दहा अंशांच्या खाली घसरलेला नाही. यामुळे थंडीचा कडाका वाढला, असे म्हणता येणार नसल्याचे अभ्यासकांनी सांगितले.


जॉगिंग ट्रॅक, ग्रीन जिमला गर्दी
 
दरम्यान दोन दिवसांपासून थंडी वाढू लागल्याने शहरातील नागरिकांची गर्दी दिसू लागली आहे. पावसाळ्यात सुने पडलेले जॉगिंग ट्रॅक आणि ग्रीन जिम आता पुन्हा गजबजण्यास सुरुवात झाली आहे. तसेच महापालिका उद्यान विभागात देखील जॉगिंग जिमच्या परिसरात स्वच्छता मोहिमा हाती घ्यावी लागणार असल्याचं चिन्ह दिसू लागली आहेत. विविध प्रभागांमधील मोकळ्या भूखंडांवरील व्यायामाचं साहित्य पावसाळ्यातील गवतांमध्ये हरवलं आहे.


आहारही बदलण्यास सुरुवात


थंडीचा ऋतू शारीरिक आरोग्यासाठी लाभदायी मानला जातो. यामुळे या दिवसात नागरिकांकडून सुकामेवा आहारात समाविष्ट केला जातो हिवाळ्यामध्ये शरीराला नैसर्गिक शक्ती मिळत असते. त्यामुळे हिवाळ्यात भूक चांगली लागते. त्यासोबतच पचनक्रिया देखील सुधारते. यामुळे हा ऋतू आरोग्यदायी मानला जात आहे. आहारासोबत व्यायामावर देखील नागरिक भर देत असून यामुळे सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारणाऱ्यांची संख्याही वाढते आहे.