Rashmi Shukla: राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंगचा आरोप असलेल्या (Phone Tapping Case) पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला (Ips Officer Rashmi Shukla) यांची पोलीस महासंचालक (डीजीपी) किंवा मुंबईच्या आयुक्तपदी म्हणून राज्यात पुन्हा नियुक्ती होणार असल्याची  शक्यता आहे.  रश्मी शुक्ला महाराष्ट्रात परतणार असल्याची माहिती मंगळवारी सूत्रांनी दिली. या संदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत.


रश्मी शुक्‍ला 1988 च्या बॅचचे आयपीएस आधिकारी आहे. रश्मी शुक्ला सध्या हैदराबाद येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. महासंचालक हेमंत नगराळे यांच्यानंतर शुक्ला या सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत.  नगराळे  31 ऑक्टोबर रोजी निवृत्त होत आहेत. रश्मी शुक्ला या राज्यातील सर्वात वरिष्ठ IPS अधिकारी आहेत.  शुक्ला या IPS अधिकारी रजनीश सेठ यांच्या देखील वरिष्ठ आहेत. शुक्ला जून 2024 मध्ये निवृत्त होत आहेत.


रश्मी शुक्ला यांची रविवारी म्हणून नियुक्त करण्यासाठी  व्हिजिलन्स क्लिअरन्स अहवाल केंद्राकडे पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत. त्यामुळे शुक्ला यांचा मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शुक्ला यांच्यावर खटला दाखल करण्याची परवानगी मागणारा पोलिसांचा प्रस्ताव राज्य सरकारने नुकताच फेटाळला होता. शुक्ला यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. कुलाबा पोलिसांनी 2019 मध्ये या नेत्यांचे फोन टॅप केल्याबद्दल शुक्ला यांच्याविरुद्ध मार्चमध्ये गुन्हा दाखल केला होता.  राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना डॉ. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे.  रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल आहे. 


महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरु झाली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मंत्र्यांचे, नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर रश्मी शुक्ला यांची केंद्रात प्रतिनियुक्ती झाली. सध्या त्या हैदराबादमध्ये सीआयएसएफमध्ये कार्यरत आहेत. काल त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर चर्चेला उधाण आलं होते.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Rashmi Shukla : खडसे, संजय राऊत फोनटॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांना दिलासा, खटला चालवण्यास राज्य सरकारचा नकार