बीड : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांना एफ आर पी चे थकीत पैसे देण्याच्या कारणासाठी साखर कारखान्याने जमीन विक्री साठी साखर आयुक्तांची परवानगी मिळवली. मात्र 25 एकर जमीन विकली सुद्धा मात्र याच प्रकरणाची माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार केली होती.


माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांची काय आहे तक्रार


राज्याचे पणन व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना केलेल्या तक्रार अर्जात प्रकाश सोळुंके यांनी सांगितले की अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर व संचालक मंडळाच्या गलथान कारभारामुळे कारखान्याला शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला.  या कारखान्यातील कामगारांची सुमारे वीस कोटी रुपये वेतन थकीत आहे. तसेच ऊस तोडणी यंत्रणा व वाहतूक ठेकेदार यांचे सुद्धा देणे बाकी आहे विशेष म्हणजे 2020- 21 या हंगामातील एक लाख 73 हजार एकशे एकोणचाळीस मेट्रिक टन गाळप होऊन सुद्धा ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे आठ कोटी 52 लाख 46 हजार रुपये जून 2019 अखेर देणे बाकी आहेत.  शेतकऱ्यांची बाकी थकीत असल्यामुळे कारखान्याचे सर्वे नंबर 2 मधील 24 हेक्टर आर जमिनीपैकी पंचवीस एकर जमीन विक्रीची परवानगी मिळण्यासाठी दिनांक 30 मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक आठ नुसार परवानगी मागितली आहेत ठराव क्रमांक एक हा विषय पत्रिकेवर नसताना ऐनवेळचा विषय म्हणून घेण्यात आला.  त्यानंतर कारखान्याची साखर आयुक्त पुणे यांना जमीन विक्री करण्याची परवानगी मिळणेबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला सदर प्रस्ताव खोटी कागदपत्रे तयार करून सादर करण्यात आला साखर आयुक्त पुणे यांनी फार पूर्वी कारवाई करणे अपेक्षित असताना देखील चुकीच्या पद्धतीने जमीन विक्री करण्यास परवानगी देण्यात आली. त्याच प्रमाणे कारखान्याचे उत्पादित केलेली साखर मध्यप्रदेश मधील व्यापाऱ्यास विक्री केली तसेच बारा लाख लिटर आर एस हे लातूर येथे विक्री करण्यात आले. सदर विक्री टेंडर न करता बोगस कागदपत्रांच्या आधारे विक्री करण्यात आली त्यामुळे कारखान्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे प्रकाश सोळंके यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.


अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांचे किती पैसे देण्यासाठी साखर आयुक्त यांनी नियमाच्या अधीन राहून साखर कारखान्याच्या मालकीची 25 एकर जमीन विक्री करण्याची परवानगी दिली होती. ही जमीन मातीमोल भावाने विक्री केली असली तरी या विक्री प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला आहे.  विद्यमान संचालक व चेअरमन स्वतःच्या मालकीची जमीन असल्यासारखे भासवत बिल्डरला विक्री केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी  शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी पुढाकार घेऊन या आदेशात च्या विरोधात आंदोलन सुद्धा केले होते.



आता अंबासाखर च्या जमीन विक्री प्रकरणी राष्ट्रवादीचे माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके यांनी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केल्याने या सगळ्या व्यवहाराला स्थगिती देण्यात आली आहेत असे पत्र सहकार मंत्र्यांच्या कार्यालयाने काढले आहे. विशेष म्हणजे  या कारखान्याच्या जमिनीचे बाजार मुल्य एकरी एक कोटीहून अधिक असताना सुद्धा बोगस मूल्यांकन रिपोर्ट तयार करून कोट्यवधी रुपयांची जमीन अतिशय कमी किमतीमध्ये विक्री केल्याचा आरोप प्रकाश साळुंके यांनी केला होता. त्यामुळे कारखान्याचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे म्हटले आता वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत या साखर कारखान्याच्या व्यवहाराची चौकशी होणार आहे त्यामुळे तूर्त तरी आंबा सहकारी साखर कारखान्याच्या जमीन विक्रीचा व्यवहार झाला आहे तो साखर कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर यांच्या अंगलट आल्याचे पाहायला मिळतंय.