एक्स्प्लोर

मुख्यमंत्री-छत्रपती संभाजीराजेंची भेट; 10 टक्के आरक्षणाला स्थगिती देऊ, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची संभाजीराजेंची माहिती

मराठा समाजाला तात्पुरत्या स्वरूपात EWS मध्ये घालणार होते त्याला तत्काळ स्थगिती देण्याची घोषणा करणार असल्याचं देखील म्हटलं आहे. जर आम्हाला 10 टक्के आरक्षणात घातलं तर पुन्हा पिटीशन दाखल होतील आणि आम्हाला अडचण निर्माण होईल.

मुंबई : मराठा समाजाला EWS प्रवर्गातून तात्पुरत्या स्वरूपात आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारची हालचाल सुरू होती. याला मराठा समाजाचा विरोध होता. त्यामुळे हे आरक्षण आम्हाला नको या मागणीसह आज छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली. भेटीत संभाजीराजेंची मागणी ऐकून घेतल्या नंतर आपण लवकरच यावर स्थगिती आणू अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती संभाजी राजेंनी दिली.

याबाबत बोलताना संभाजी राजे म्हणाले की, बैठकीत EWS आरक्षणाबाबत आमची चर्चा झाली आहे. इडब्ल्यूएसच्या 10 टक्क्यांच्या आरक्षणाला सर्व समाजाचा विरोध होता. कारण मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाला सामाजिक मागास ठरवलं आहे. त्याबाबत कायदा देखील झाला आहे. म्हणून मराठा समाजाला एसईबीसीचं आरक्षण मिळालं परंतु त्यावर स्थिगिती बसली आहे. त्यावर आम्हाला 10 टक्के आरक्षण देतो असं आम्हाला सांगण्यात आलं. परंतु आमच्या माहितीनुसार असं आरक्षण मराठा समाजाला देता येतं नाही. आणि जरी द्यायचं ठरवलं तरी त्याच्या जाचक अटीं मराठा समाजाला मान्य होऊ शकत नाहीत. या मिटिंगला सर्व अधिकारी होते. महाधिवक्ता कुंबकोणी देखील उपस्थित होते. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण देखील होते. त्यांनी मान्य केलं आहे की, आमची चूक झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमची बाजू ऐकून घेतल्यानंतर ताबडतोब आदेश काढण्यासाठी सांगितले आहेत.

मराठा समाजाला तात्पुरत्या स्वरूपात EWS मध्ये घालणार होते त्याला तत्काळ स्थगिती देण्याची घोषणा करणार असल्याचं देखील म्हटलं आहे. जर आम्हाला 10 टक्के आरक्षणात घातलं तर पुन्हा पिटीशन दाखल होतील आणि आम्हाला अडचण निर्माण होईल. आजच्या बैठकीत मेगा भरतीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही परंतु आमची मागणी आहे जोपर्यंत कोर्टात निर्णय होतं नाही तोपर्यत कोणतीही राज्यात भरती घेऊ नये.

यासोबतच राज्यात सुपर न्युमरी पद्धतीने म्हणजेच अलौकिक पद्दतीने 12 टक्के शिक्षणासाठी आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासोबतच पंढरपूरमध्ये शरद पवार यांनी दोन्ही राजेंबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना संभाजीराजे म्हणाले की, शरद पवार काय बोलले यावर मी बोलणार नाही. परंतु राज्यसभेत प्रथम या विषयावर बोलणारा खासदार मी आहे. यासोबतच आजपर्यंत मराठा समाजासाठी आंदोलन करणारा खासदार देखील मीच आहे.

ओबीसी समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि हरिभाऊ राठोड यांनी आज घेतलेल्या भेटीबाबत बोलताना राजे म्हणले की, त्यांची मराठा आरक्षणाबाबत कोणतीही नाराजी नाही. आमचा विषय एससीबीसी संदर्भात आहोत. त्यांनी आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच प्रकाश शेंडगे देखील भेटले त्यांनी देखील आमचा कसलाही विरोध नसल्याच म्हटलं आहे. आमचा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावून आरक्षण घेण्याचा कोणताही हेतू नाही. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठा आरक्षण प्रश्नी भेटीची वेळ मागितली आहे, परंतु कोरोनामुळे अद्याप वेळ मिळालेली नाही. वेळ मिळाली की आम्ही सर्व खासदारांना घेऊन जाऊ.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जुलै 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जुलै 2026 | रविवार
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Nashik Crime News: चिकन व्यावसायिकाला अडवलं, 'गुटखा तस्करी'ची भीती दाखवून पैसेही उकळले; नंतर पुन्हा पैशांची मागणी करणारा लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकला, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
चिकन व्यावसायिकाला अडवलं, 'गुटखा तस्करी'ची भीती दाखवून पैसेही उकळले; नंतर पुन्हा पैशांची मागणी करणारा लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकला, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Embed widget