एक्स्प्लोर

कोरोनावर लस आली तरी मास्क लावणं बंधनकारक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray addressing : कोरोनावर लस आली तरी मास्क लावणं बंधनकारक राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे आज दुपारी एक वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला संबोधित केलं.

मुंबई : कोरोनावर लस आली तरी मास्क लावणं बंधनकारक राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपल्या सुरक्षेसाठी कोरोनाबाबतचे नियम आपल्याला पाळावेच लागणार आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. कोविड सुरू झाला तेंव्हा भेटींची वारंवारता जास्त होती.  मी आजपर्यंत जे काही सांगत आलो ते आपण मनापासून अंमलात आणत गेलात, त्यामुळे आपण नियंत्रण मिळवले आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी एक वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला संबोधित केलं.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,  देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धनजींनी सांगितल आहे की व्हॅक्सिन आली तरी मास्क लावावा लागेल. त्यामुळे माझ्या मते 6 महिने तरी मास्क लावावा लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. पूर्ण नाही पण काही प्रमाणात संसर्गाला अटकाव आला आहे. जनतेने कोरोना प्रतिबंधक नियमांच पालन केलं. सावध रहा हे सांगण कुटुंबप्रमुख म्हणून माझं कर्तव्य आहे, असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन कायद्याने लावू शकतो. परंतु धन्यवाद द्यायचे आहेत कारण बहुतांशी लोक सूचनाचे पालन करत आहेत. 70-75 टक्के लोक पालन करत आहेत परंतु उर्वरित लोकांमुळे हे खबरदारी घेणारे देखील धोक्यात येतील. परदेशातुन येणार्‍या प्रवाशांच्या टेस्ट थांबवा असे लोक म्हणत आहेत, परंत कसं थांबवायचं? आपण धिम्या गतीने पुढे जात आहोत. सावधपणे पावले उचलत आहोत. अनुभवातुन आपल्याला शहाणपण आलेलं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की, लग्नसराई सुरू झाली की 'यायच हं!' असं आमंत्रण द्यायची पद्धत आहे. परंतु हे आमंत्रण आपण कोरोनाला तर देत नाही ना? याची सावधानता बाळगा. माता भगिनींना परत सांगतो, आपण बाहेर जात असाल तर मास्क हे सार्वजनिक क्षेत्रात आपले संरक्षण करणारे शस्त्र आहे, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले, युरोपमध्ये कडक लॉकडाऊन आजपासून केला आहे. तो का करावा लागला? त्याची कारणे आहेत. आपल्याकडे सण गेले परंतु आता न्यू ईअर येत आहे. कोरोनाने आता रुप बदलले आहे. आर नॉट असे त्याला टेक्निकल भाषेत संबोधतात. काळासोबत बदला म्हणतात तसं व्हायरसने रुप बदललं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Abhijeet Dipke : अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget