पुणे : कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने (Hemant Dabhekar) मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची भेट घेतल्याच्या बातमीला काही तास उलटत नाही, तो आता पुण्यातील एका गुंडासोबत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) भेटीचा फोटो समोर आला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा फोटो ट्वीट करत, महाराष्ट्रात गुंडा राज..., गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य' असे म्हणत सरकारवर टीका केली आहे. 


डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुंड हेमंत दाभेकरने वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. विशेष म्हणजे श्रीकांत शिंदे आणि हेमंत दाभेकर यांच्या भेटीचा फोटो समोर आला होता. त्यानंतर आता पुण्यातील गुंड निलेश घायवळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटो समोर आला आहे. संजय राऊत यांनी हा फोटो ट्वीट केला आहे. विशेष म्हणजे मगील काही दिवसांपासून राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था पाहता सत्ताधारी नेतेच गुंडांना आश्रय देत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. 


कोण आहे निलेश घायवळ?


निलेश घायवळ पुण्यात गॅंगस्टर म्हणून ओळखा जातो. त्याच्यावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात विविध प्रकारचे 14 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागणे या सारखे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. खून, खूनाचा प्रयत्न असेही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. घायवळ हा टोळी करून गुन्हे करत असल्याने पुणे पोलिसांनी 2021 मध्ये त्याच्याविरोधात मोक्काची कारवाई केली होती. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी एक वर्षासाठी येरवडा कारागृहात घायवळला स्थानबद्ध केले होते. आता त्याच निलेश घायवळचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो संजय राऊत यांच्याकडून ट्वीट करण्यात आले आहे. त्यामुळे यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 


शिंदे यांचा फोटो राऊतांनी ट्वीट केला आहे. 


राऊतांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, 'महाराष्ट्रात गुंडा राज! गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य! हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा.कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते..आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने.'






इतर महत्वाच्या बातम्या : 


मोठी बातमी! पुण्यातील कुख्यात गुंड श्रीकांत शिंदेंच्या भेटीला, भेटीचा फोटोही आला समोर