एक्स्प्लोर

संपूर्ण मराठवाड्याला दुष्काळमुक्त करु, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी पाहिलं होतं. बीड जिल्ह्यामध्ये कृष्णाखोऱ्याचं पाणी आलं पाहिजे, हे मुंडे साहेबांचं स्वप्न होतं. त्यामुळे मराठवाड्याच्या वाट्याचं 7 टीएमसी पाणी देण्याच्या प्रकल्पाला आपण मान्यता दिली आहे.

बीड : गोदावरीत पाणी आणून संपूर्ण मराठवाड्याला दुष्काळमुक्त करु, असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृती दिनी आज गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महिला आणि बालविकास कल्याण मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या.

गोदावरीच्या खोऱ्यातून पश्चिम वाहिन्या नद्यांचे पाणी समुद्रात वाहून जाते. ते पाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यात आणले जाणार आहे. या संबधीचा प्लान तयार आहे. मराठवाड्यातील सगळी धरणे पाईपने जोडून पिण्याचे पाणी प्रत्येक ठिकाणी पोहचवण्याची वॉटर ग्रीड योजनेला मंजुरी दिली आहे. इस्राईलसोबत करार करून हे काम केलं जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी पाहिलं होतं. बीड जिल्ह्यामध्ये कृष्णाखोऱ्याचं पाणी आलं पाहिजे, हे मुंडे साहेबांचं स्वप्न होतं. त्यामुळे मराठवाड्याच्या वाट्याचं 7 टीएमसी पाणी देण्याच्या प्रकल्पाला आपण मान्यता दिली आहे. लवकरच हे पाणी बीड जिल्ह्यात पोहोचेल आणि मुंडे साहेबांचं स्वप्न साकार केल्याचा आज आनंद झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

मुंडे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी मुंडे साहेबांचा राजकारणाचा वारसा जपला. लोकांसाठी काम करणे त्यांनी सुरु ठेवलं. काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला की पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे गोपीनाथ मुंडे यांचं नाव का लावतात? अशा लोकांना उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, गोपीनाथ मुंडे यांच नाव पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे लावणार नाहीत तर काय तुमच्या सारखे करंटे लावणार का? तसेच गोपीनाथ मुंडे यांचं नेतृत्व ज्यांना मान्य केलं, त्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचं नाव लावण्याचा अधिकार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या

पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
Embed widget