नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कॅशलेस व्यवहाराला सुरुवात केली आहे. अधिवेशनासाठी नागपुरात असलेल्या मुख्यमंत्र्यांनी 200 रुपयांची अडीच डझन संत्री विकत घेतली. त्या संत्र्याच्या बदल्यात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याला रोख पैसे दिले नाहीत, तर फडणवीसांनी शेतकऱ्याला पेटीएमद्वारे पेमेंट केलं.

बँकेतील गर्दी टाळण्यासाठी नेट बँकिंगचा वापर कसा कराल?


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या जनतेला कॅशलेस होण्याचं आवाहन केलं आहे. त्याची अंमलबजावणी आज मुख्यमंत्र्यांनी पेटीएमद्वारे संत्री विकत घेऊन केलेली दिसते.

इंटरनेटशिवाय मोबाईल बँकिंग कसं वापराल?

राज्य सरकारनेही कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सरकार पेटीएमसारखंच स्वत:चं 'महा वॉलेट' नावाचं ई-वॉलेट आणणार आहे.

पेटीएम

ऑनलाइन व्यवहारासाठी प्रसिद्ध असलेल्या पेटीएमच्या वापर आर्थिक व्यवहारांसाठी करता येऊ शकतो. दिवसाच्या कुठल्याही वेळी कुठूनही मनी ट्रान्सफर करण्यासाठी पेटीएमचा वापर करता येऊ शकतो. या वॉलेटद्वारे मोबाईल रिचार्ज, विविध बिलं, बस, रेल्वे, विमानाचं बुकिंग, सिनेमाचं तिकीट यासारखी आर्थिक देवाणघेवाण करणं सहज शक्य आहे.

पेटीएम कसे वापराल?

प्लेस्टोअरवरुन पेटीएम अॅप डाऊनलोड करा किंवा पेटीएम.कॉम या वेबसाईटला जा. ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर रजिस्टर केल्यावर तुम्हाला वनटाईम पासवर्ड मिळेल. त्यानंतर होमपेजवर तुम्हाला मोबाईल प्रीपेड/पोस्टपेड, इलेक्ट्रिसिटी, डीटूएच, मूव्हीज, फ्लाईट, बस असे विविध पर्याय मिळतील.

पेटीएमच्या अकाऊण्टमध्ये पैसे कसे भराल?

  1. होमपेजवर ‘अॅड मनी’ या पर्यायावर क्लिक करा
    2. किती रुपयांचा बॅलन्स टाकायचा आहे, ती रक्कम निवडा
    3. ‘अॅड मनी’ क्लिक करा
    4. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग यापैकी तुम्हाला हवा तो पर्याय निवडा
    5. आवश्यक ते डिटेल्स (कार्ड नंबर, सीव्हीसी इ.) टाका
    6. ‘अॅड मनी’ वर क्लिक केल्यावर पेटीएममध्ये बॅलन्स जमा होईल.


संबंधित बातमी

कॅशचा तुटवडा, 'पेटीएम', 'पेझॅप'सारखे ई-वॉलेट कसे वापराल?

इंटरनेटशिवाय मोबाईल बँकिंग कसं वापराल?

Paytm ला आता सरकारच्या 'महा वॉलेट'चं आव्हान

आधार कार्डद्वारे आर्थिक व्यवहार करण्यासाठी लवकरच मोबाईल अॅप

बँकेतील गर्दी टाळण्यासाठी नेट बँकिंगचा वापर कसा कराल?