महादेव जानकर यांनी आचारसंहितेचा भंग करुन आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला. काही दिवसांपूर्वी फोनवरुन एका निवडणूक अधिकाऱ्याला दमदाटी करतानाचा जानकरांचा व्हिडिओ व्हायरल झाला. दरम्यान, याप्रकरणी जानकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते.
विधीमंडळात विरोधकांनी जानकरांच्या राजीनाम्याप्रकरणी बराच गोंधळ घातला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा बचाव केल्याचं पाहायला मिळालं.
'महादेव जानकर बिचारे, सज्जन आहेत. माणूस म्हणून चांगले आहेत. पण थोडं मोठ्यानं बोलतात. एवढ्या घाईने त्यांचा राजीनामा मागणं हा त्यांच्यावर अन्याय होईल.' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जानकरांचा बचाव केला.
काय आहे नेमकं प्रकरण?
गडचिरोली जिल्ह्यातील वडसा नगरपालिकेसाठी दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. याठिकाणी आपण पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला कपबशी हेच चिन्ह द्या, अशी मागणी महादेव जानकर यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे केली होती. शिवाय काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्याच्या सूचनाही यावेळी जानकर यांनी निवडणूक अधिकाऱ्याला दिल्या.
यासंबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे वृत्त वाहिन्यांवरुनही प्रसारित झाले. यानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेत, जानकरांविरोधात तक्रार दाखल केली होती.
VIDEO:
संबंधित बातम्या:
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरुन महादेव जानकरांवर गुन्हा दाखल
दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांना निवडणूक आयोगाची नोटीस
निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव नव्हे, विनंती केली, जानकरांचं स्पष्टीकरण
काँग्रेसचा अर्ज बाद करायचा, महादेव जानकरांचा व्हिडीओ व्हायरल