मुंबई/नागपूर :  राज्यातील जिल्हा बँकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण जिल्हा बँकावरील निर्बंध हटवून, पैसे भरणे आणि काढण्याला परवानगी मिळण्याचे संकेत आहेत. उद्या - बुधवारी संध्याकाळपर्यंत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.


गेले दोन दिवस नाबार्डने राज्यातील 31 जिल्हा बँकची तपासणी केली. त्यातल्या ठेवी, जमा झालेले पैसे, झालेले व्यवहार याबाबत नाबार्डने तपासणी करुन, आपला अहवाल  अर्थ मंत्रालयाला सादर केला आहे.

जिल्हा बँकेला पैसे द्यावे आणि खात्यात पैसे भरण्यासाठी, काढण्यासाठी परवानगी द्यावी, या दोन मागण्या राज्य सरकारने केल्या होत्या.

राज्य सरकारच्या या मागण्या पूर्ण होण्याची शक्यता आहे. उद्या संध्याकाळपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे.

जिल्हा बँकांवर निर्बंध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि हजार रुपयाच्या नोटा चलानातून रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवसातच जिल्हा बँकांवर निर्बंध घालण्यात आले होते. जिल्हा बँकांत पैसे भरण्यास आणि काढण्यास मज्जाव करण्यात आला होता.

मात्र जिल्हा बँकांमुळे ग्रामीण भागावर आणि शेतकऱ्यांवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे या बँकांवरील निर्बँध हटवण्याची मागणी विरोधकांनी केली होती. तसंच महाराष्ट्राचं शिष्टमंडळही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना यासाठी भेटलं होतं.

संबंधित बातम्या


सहकारी बँकांना नोटा बदलीची परवानगी नाहीच : जेटली