एक्स्प्लोर
मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचा एकत्र विमान प्रवास
मुखमंत्र्यांनीही हा दौरा कमालीचा गुप्त ठेवला होता. काल रात्री रात्रीच्या सुमारास मुख्यमंत्री मुंबईहून आपल्या खास विमानाने औरंगाबादकडे निघाले.
औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी एकाच विमानातून प्रवास केला. एका लग्नसोहळ्याला हजेरी लावण्यासाठी दोन्ही नेते एकाच विमानातून रवाना झाले.
महत्वाचं म्हणजे विमानतळावर उतरल्यानंतर दोघंही एकाच गाडीनं लग्नसोहळ्यात पोहोचले. मुखमंत्र्यांनीही हा दौरा कमालीचा गुप्त ठेवला होता. काल रात्री रात्रीच्या सुमारास मुख्यमंत्री मुंबईहून आपल्या खास विमानाने औरंगाबादकडे निघाले.
चिकलठाणा विमानतळावर विमान लँड झालं, त्यावेळी दोन्ही नेते या विमानातून उतरले आणि पुढे एकाच गाडीनं लग्नकार्यात पोहोचले.
या विमानप्रवासादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप समजू शकलेलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement