मुंबई: दिवसभरातील अस्थिरतेनंतर शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये किरकोळ बदल झाला आहे. मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक सेन्सेक्समध्ये केवळ 8 अंकाची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निर्देशांक निफ्टीमध्ये 18 अंकांची घसरण झाली. बाजाराची सुरुवात झाल्यानंतर शेअर बाजार चांगलाच वधारला, पण बाजार बंद होताना तो पुन्हा घसरला.
शेअर बाजार बंद होताना आज 1336 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1857 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. 138 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
आज Axis Bank, Britannia Industries, SBI, HDFC Life आणि SBI Life Insurance या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर Bajaj Auto, Cipla, Eicher Motors, BPCL आणि Tech Mahindra या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली.
बाजार बंद होताना आज ऑटो, सार्वजनिक बँका, रिअॅलिटी, मेटलच्या शेअर्समध्ये 1 ते 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर उर्जा आणि फायनान्शिअल क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली.
रुपयाची घसरण कायम
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण कायम सुरू असून आज रुपयाची किंमत 78.97 इतकी आहे.
आज शेअर बाजारात सेन्सेक्स निर्देशांक 129.81 अंकांच्या घसरणीसह सुरू झाला. सेन्सेक्स 52,897 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांक 24.60 टक्क्यांच्या घसरणीसह सुरू झाला. निफ्टी 15,774 अंकांवर खुला झाला. घसरणीनंतर काही वेळेतच शेअर बाजार वधारला. सकाळी 9.55 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 281 अंकांनी वधारून 53,307 अंकावर वधारत होते. निफ्टी 72 अंकांनी वधारत 15,872.60 अंकावर व्यवहार करत होता.
महत्त्वाच्या बातम्या: