Personal Loan Update :  सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्तीचा खर्च वाढला आहे. परंतु, वाढलेला खर्च महिन्याच्या पगारात निघत नाही. त्यामुळे सामान्य माणूस वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करतो. परंतु, हे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी महत्वाचा असतो तुमचा सिबील स्कोर. तुमचा सिबील स्कोर चांगला असले तर कर्ज मिळण्याची प्रक्रिया सोपी होती. शिवाय सिबील स्कोर चांगला असेल तर तुम्ही घेतलेल्या कर्जावर व्याजदर देखील कमी लागते. 


सिबील स्कोर हा 300 ते 900 गुणांच्या दरम्यान चांगला असतो. तुमचा स्कोर750 किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास बँक तुम्हाला सहज कर्ज देऊ शकते. सिबील स्कोअर 24 महिन्यांच्या क्रेडिट इतिहासावर आधारित असतो. क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड ही भारतातील एकमेव एजन्सी आहे. ही एजन्सी तुमचा सिबील स्कोर देत असते.  


कशावर ठरतो सिबील स्कोर?
तुम्ही घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड करत आहात की नाही यावर  30 टक्के सिबील स्कोर अवलंबून असतो. तर 25 टक्के सिबील स्कोर सुरक्षित किंवा असुरक्षित कर्जावर अवलंबून असतो. शिवाय क्रेडिट एक्सपोजरवर 25 टक्के आणि कर्जाच्या वापरावर 20 टक्के स्कोर अवलंबून असतो. 


असे होईल सिबील खराब
तुम्ही बँकेकडून कर्ज घेतले असेल आणि ते वेळेवर भरले नाही, तर तुमचा क्रेडिट स्कोर खराब होईल किंवा कमी होईल. तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल आणि तुम्ही बिल वेळेवर भरले नाही तर त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर वाईट परिणाम होतो. तुम्ही तुमच्या बँक खात्यात किमान शिल्लक ठेवली नाही किंवा त्यात उणे शिल्लक असली तरीही तुमच्या क्रेडिट स्कोअर खराब होतो. 


सिबील स्कोर कसा तपासायचा?


तुमचा सिबील स्कोर तपासण्यासाठी प्रथम www.cibil.com या वेबसाइटवर जा.
तेथे होम पेजवर Get Your Free CIBIL Score वर क्लिक करा.
त्यानंतर आपले नाव, ईमेल आयडी भरा आणि पासवर्ड तयार करा. 
यानंतर तुमचा कोणताही आयडी पुरावा (पासपोर्ट क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक, आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र क्रमांक) निवडा. त्यानंतर तुमचा पिन कोड, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर टाका.
सर्व माहिती दिल्यानंतर Accept आणि continue वर क्लिक करा.
तुमच्या मोबाईलवर मिळालेला वन टाइम पासवर्ड (OTP) एंटर करा आणि सुरू ठेवा वर क्लिक करा.
तुम्हाला 'तुमची नोंदणी यशस्वी झाली' असा मेसेज मिळेल. त्यानंतर वेबसाइटच्या डॅशबोर्डवर जा. आता
तुमचा सिबील स्कोर तुमच्या समोर येईल. 


महत्वाच्या बातम्या


PAN-Aadhaar Linking Penalty : पॅन कार्ड आधारशी लिंक केलं? आजच करा, नाहीतर भरावा लागेल 1000 रुपयांचा दंड 


Gold Rate Today : सोन्याच्या दरात किरकोळ वाढ, तर चांदी किंचित स्वस्त; वाचा आजचे दर