LIC Premium Payment Through Online Mode: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC)ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. या विमा कंपनीचे देशभरात कोट्यवधी पॉलिसीधारक आहेत. प्रत्येक वर्षी पॉलिसीधारकाला आपला प्रीमियम भरावा लागतो. एलआयसीने आपल्या ग्राहकांसाठी ऑनलाइन प्रीमियम भरण्यासाठी सुविधा सुरू केली आहे. अनेकदा ग्राहकांचा रांगेमुळे वेळ वाया जातो. त्यामुळे बरेच पॉलिसीधारक प्रीमियम भरण्यासाठी कंटाळा करतात. आता, पॉलिसीधारकांच्या सोयीसाठी एलआयसीने ऑनलाइन पेमेंट सुरू केले आहे.
पॉलिसीधारकाला ऑनलाइन प्रीमियम पेमेंट केल्यानंतर पावतीदेखील लगेच मिळणार आहे. ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी तुम्ही LIC Pay Direct अॅप डाऊनलोड करा. त्याशिवाय, एलआयसीच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला ऑनलाइन पेमेंट करता येईल.
प्रीमियम स्टेट्स कसे तपासावे?
> पहिल्यांदा तुम्ही https://www.licindia.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.
> त्यानंतर तुम्ही नाव, पॉलिसी क्रमांक नमूद करा
> एलआयसीच्या 022-68276827 या हेल्पलाइन क्रमांकावर किती प्रीमियम भरायचा आहे, याचीदेखील माहिती मिळू शकते.
> LICHELP <पॉलिसी क्रमांक> नमूद करून 9222492224 या क्रमांकावर पाठवू शकता. या क्रमांकावर मेसेज करण्यासाठी शुल्क लागू होणार नाही.
>> LIC Pay Direct अॅपद्वारे प्रीमियम भरावा
1. अॅप सुरू करून तुम्ही Pay Premium हा पर्याय निवडावा.
2. त्यानंतर तुम्ही Proceed पर्यायावर क्लिक करा.
3. त्यानंतर प्रीमियम पर्याय निवडा.
4. तुमचा पॉलिसी क्रमांक, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी आदी नमूद करा.
5. त्यानंतर तुमची सगळी माहिती व्हेरिफाय केली जाईल आणि पुढे पेमेंट करण्याचा पर्याय दिसेल.
6. नंतर तुम्हाला नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, युपीआय आदीद्वारे पेमेंट करता येईल.
7. त्यानंतर मोबाइलवर तुम्हाला ओटीपी क्रमांक येईल. तो नमूद करून प्रीमियम भरावा.
8. यानंतर Electronic Receipt तुम्हाला मिळेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या: