मुंबई : कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. राज्यातील परिस्थिती आता नियंत्रणात आली आहेत. त्यामुळेच लॉकडाऊनच्या अटी देखील हळूहळू शिथील केल्या जात आहेत. त्यात गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा, कॉलेज देखील हळूहळू सुरु होणार आहेत. ग्रामीण भागात कोरोनामुक्त गावातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. मात्र यासाठी ग्रामपंचायतीने शाळेच्या अखत्यारितील पालकांशी चर्चा करून ठराव करावा लागणार आहेत. ो


शाळा कशा उघडणार आणि नियमावली काय? 


शाळा सुरु झाल्यानंतर टप्प्याटप्याने विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्यात येणार आहे. कोरोना संबंधी संबंधी नियमांचे पालन करावे लागणार आहेत. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आदीचा समावेश आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळली जावी यासाठी एक बाकावर एकाच विद्यार्थ्याला बसता येणार आहे. दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर असायला हवे. एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी बसू शकतील. सतत हात साबणाने धुणे, मास्क घालणे हे नियम पाळवे लागणार आहेत. 


विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षण आढळल्यास घरी पाठवलं जाईल. तसेच लगेच कोरोना चाचणी करावी लागणार आहे. संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था त्याच गावात करावी लागणार आहे किंवा त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था न वापरण्याची दक्षता घ्यावी लागेल. अशा रितीने शाळा सुरु करायची असल्यास या सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे.


राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती


राज्यात काल केवळ 3,378 रुग्णांनाच डिस्चार्ज मिळाला आहे. तर 9,336  नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. अॅक्टिव्ह केसेस आता एक लाख 23  हजारांच्या वर  गेल्या आहेत. काल मालेगाव आणि गोंदियामध्ये एकही कोरोना रुग्णांची नोंद सरकारी आकडेवारीनुसार झालेली नाही. तर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 1461 तर कोल्हापूर शहरात 389 असे एकूण 1850 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. सांगलीचा आकडाही हजारांच्या वर नोंदवला. आज 38 मनपा क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. तर राज्यात काल 123 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. राज्याचा मृत्यूदर 2. 01 टक्के आहे. राज्यात सध्या 1,23,225  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.