धुळे : सुरुवातीला मुसळधार पडणाऱ्या पावसानं गेल्या काही दिवसांपासून दांडी मारल्याचं दिसून येतंय. धुळे जिल्हातील शिरपूर तालुक्यात पावसानं दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दूबार पेरणी चे संकट ओढावले आहे. शेतकऱ्यांना पूर्वीच्या अव्वाच्या सव्वा दराने, कांदा सोयाबीन व कपासीचे बियाणे खरेदी केली होती. आता पुन्हा बियाणे खरेदी करावी लागतील या शक्यतेने शेतकरी हवालदिल झाले आहेत.


हवामान खात्याने यंदा मान्सून वेळेवर आणि चांगल्या प्रकारे येणार असल्याचं सांगितलं होतं. सुरुवातीला प्रत्यक्षात काही प्रमाणात पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांनी अत्यंत महागामोलाची खते-बियाणे कर्ज काढून खरेदी केली आणि पेरणी केली. पण पावसाने ओढ दिल्याने उगवलेले ईवलेसे पिके आता करपून जावू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनार दुबार पेरणीचे संकट उभे ठाकल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. 


पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झालं आहे. शिरपूर तालुक्यात खरिपाच्या 20 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पाऊस नसल्यामुळे सगळीच पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.


कोरोना ,लॉकडाऊन यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसतो आहे .दुबार पेरणीसाठी बाजारात आधीच तूटवडा असलेल्या बियांणांचे करायचे काय असा मोठा प्रश्न निर्माण झाला आह., दुबार पेरणी साठी पैसे कोठून आणायचे असाही प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने त्वरीत शेतकऱ्यांच्या बांधावर मोफत खते ,बी-बियाणे उपलब्ध करुन देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.


महत्वाच्या बातम्या :