एक्स्प्लोर

पहिलीतील विद्यार्थ्याचे वर्गमैत्रिणीवर कर्कटकाने वार, पुण्यातील धक्कादायक घटना

इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्याच वर्गातील विद्यार्थिनीला कर्कटकाने भोसकल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.

पुणे : सहा वर्षांच्या चिमुरड्याने आपल्याच वर्गातील विद्यार्थिनीला कर्कटकाने भोसकल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. विशेष म्हणजे येरवडा पोलिसांनी वर्गशिक्षिकेवर गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका शिक्षिकेवर ठेवण्यात आला आहे. येरवड्यातील इंग्रजी माध्यमाच्या एका खाजगी शाळेत हा प्रकार घडला. संबंधित सहा वर्षांच्या चिमुरडीला गंभीर जखम झाल्यामुळे तिची आई डॉक्टरांकडे घेऊन गेली होती. यावेळी ही जखम धारदार वस्तूमुळे झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. अखेर आईने खोदून विचारल्यावर चिमुकलीने घडलेला प्रकार सांगितला. 'टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे. आपल्याच वर्गात शिकणाऱ्या मुलाने कर्कटकाने वार केल्याचा दावा विद्यार्थिनीने केला. आरोपी विद्यार्थी आणि जखमी विद्यार्थिनी इयत्ता पहिलीत शिकतात. दुपारी पाऊण ते दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली. वर्गातील सर्वजण डान्स क्लाससाठी गेले होते, मात्र झोप आल्यामुळे संबंधित विद्यार्थिनी वर्गात बाकावर डोकं ठेवून बसली. त्यावेळी आरोपी विद्यार्थी तिच्याजवळ गेला आणि आपली पट्टी तोडल्याबद्दल तिच्यावर ओरडला. रागाच्या भरात कंपासपेटीतून त्याने कर्कटकाने तिच्यावर वार केले. विद्यार्थ्याने तीन वेळा वार केल्यानंतर तिने आरडाओरडा केला. त्यानंतर शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी वर्गात धाव घेतली. रक्तस्राव थांबत नसल्याने तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमी विद्यार्थिनीच्या आईने येरवडा पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सुरक्षेबाबत हयगय केल्याप्रकरणी शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला.

महत्त्वाच्या बातम्या

Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
जरांगे पाटील संतापले, म्हणाले, 15 पैकी एकही मागणी मान्य नाही, एकेरी भाषेबद्दल बोलणाऱ्या भरत गोगावलेंनाही इशारा
जरांगे पाटील संतापले, म्हणाले, 15 पैकी एकही मागणी मान्य नाही, एकेरी भाषेबद्दल बोलणाऱ्या भरत गोगावलेंनाही इशारा
Ganeshotsav Toll free pass : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी  खूशखबर! टोल मोफत!
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी  खूशखबर! टोल मोफत!

व्हिडीओ

Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report
PM Modi on Gen Z : तरुणांनी AI कौशल्य विकसित करण्याची गरज : नरेंद्र मोदी | Special Report ABP Majha
Sugercane : साखर हंगामासाठी घाई का? Special Report
How to search for a Kunbi record : कुणबी नोंद कशी शोधायची? सर्व माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rakesh Mehta: दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्त्याचा मानहानीचा खटला दाखल; 2 कोटींच्या भरपाईची मागणी
अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्त्याचा मानहानीचा खटला दाखल; 2 कोटींच्या भरपाईची मागणी
Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
Indian  Hockey Team: भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
Raghav Chadha Voter Row : आधी म्हणाले पंजाबमधून नाव वगळलं, आता राघव चढ्ढा अचानक दिल्लीचे मतदार कसे झाले? 'आप'चा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
आधी म्हणाले पंजाबमधून नाव वगळलं, आता राघव चढ्ढा अचानक दिल्लीचे मतदार कसे झाले? 'आप'चा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
कुटुंब फिरायला गेले, 23 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी घेऊन पसार; ऐटीत बॅग अडकवून जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद
कुटुंब फिरायला गेले, 23 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी घेऊन पसार; ऐटीत बॅग अडकवून जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद
Embed widget