एक्स्प्लोर

पानटपऱ्यांवर आता गोळी-चॉकलेट, बिस्किट विक्रीला बंदी

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचा परवाना दिलेल्या दुकानांना खाद्यपदार्थाची विक्री करण्यास बंदी असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने गेल्या वर्षी जाहीर केलं होतं.

मुंबई : लहान मुलांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं व्यसन लागू नये, यासाठी राज्य सरकारने जालीम उपाय शोधला आहे. पानटपरी विक्रेत्यांना दुकानात यापुढे चॉकलेट, वेफर्स, बिस्किटं यासारखे खाद्यपदार्थ विकण्यास राज्यभरात बंदी असेल. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये चॉकलेट, बिस्किट, चिप्स यासारखे खाद्यपदार्थ आढळले, तर दुकानांवर कारवाई करण्यात येईल, असं अन्न आणि औषध प्रशासनाने स्पष्ट केलं. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचा परवाना दिलेल्या दुकानांना खाद्यपदार्थाची विक्री करण्यास बंदी असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने गेल्या वर्षी जाहीर केलं होतं. मात्र हा निर्णय राज्य सरकारला बंधनकारक नसल्यामुळे याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे सोपवले होते. पानाच्या टपऱ्यांवर सर्रासपणे गोळ्या, चॉकलेट, बिस्किटं, शीतपेयं, चहा, कॉफी, वेफर्स, चिप्स यासारख्या खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. त्यामुळे हे पदार्थ घेण्यासाठी शालेय विद्यार्थी आणि तरुणवर्ग दुकानात येतो. त्याचवेळी तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाकडे आकर्षित होण्याची शक्यता असते. विद्यार्थ्यांना तंबाखूचं व्यसन जडण्याची शक्यता वर्तवत सरकारने हा निर्णय घेतला आहे. तंबाखूजन्य पदार्थांसोबत खाद्यपदार्थाची विक्री करण्यास बंदी करण्यात आल्यामुळे किराणा माल किंवा अन्य खाद्यपदार्थाच्या दुकानांमध्येही तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला मनाई असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget