(Source: ECI/ABP News/ABP Majha)
...त्यावेळी पवार साहेब म्हणाले होते, 'तुझा नवरा अडकणार नाही' : चित्रा वाघ
भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन चित्रा वाघ चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्रास दिला जातोय पण मला त्याचा फरक पडत नाही, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
नाशिक : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन चित्रा वाघ चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. फक्त चित्रा वाघचा नवरा आहे म्हणून किशोर वाघवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझ्या नवऱ्याला मेंटली टॉर्चर केले जात आहे, त्रास दिला जातोय पण मला त्याचा फरक पडत नाही, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध ACBकडून गुन्हा दाखल
चित्रा वाघ म्हणाल्या की, मला आज पवार साहेबांची आठवण येतेय. तो माझा बाप आहे. ज्यावेळी हे प्रकरण बाहेर आलं त्यावेळी मी सिल्व्हर ओकवर गेले होते. पवार साहेबांनी आधी सर्व प्रकरण बघितले आहे तुझा नवरा अडकणार नाही असे पवार साहेब म्हणाले होते, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
चित्रा वाघ म्हणाल्या की, संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक झाल्यानंतर मला धमक्यांचे फोन केले. माझे विकृत फोटो वायरल केले. पण मला फरक पडत नाही. माझ्या नवऱ्यावर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. माझ्या फॅक्ट्री नाहीत. गुन्हा दाखल झाला हे मला आता पत्रकारांकडून कळाले. मला मात्र काहीही कल्पना नाही. चौकशीसाठी घरी येऊन नोटीस दिली. गुन्हा दाखल केला तेव्हा व्हॉट्सअॅप वरून कळवतात, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
Pooja Chavan Death Case | संजय राठोड याला चपलेनं झोडलं पाहिजे : चित्रा वाघ
चित्रा वाघ म्हणाल्या की, माझा नवरा तर कुठेच नव्हता, तरीही गुन्हा दाखल केला, ज्याने पैसे घेतले त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल नाही. गजानन भगत हा मुख्य आरोपी त्याला का सोडले? असा सवाल त्यांनी केला. 2011 पासूनच्या अनेक केस पेंडिंग आहे, एवढी तत्परता आता कशी? असंही त्या म्हणाल्या. चित्रा वाघचा नवरा म्हणून शिक्षा देतात का? माझा न्याय संस्थेवर विश्वास आहे, मुर्दाड सरकारवर नाही. मला कितीही त्रास दिला तरी तुम्हाला सगळ्यांना मी चित्रा वाघ एकटी पुरुन उरणार, असंही त्या म्हणाल्या.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल
किशोर वाघ - नेमकं प्रकरण काय? किशोर वाघ हे मुंबईच्या परेल येथील गांधी रुग्णालयात कार्यरत होते. 2016 मध्ये चार लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी किशोर वाघ यांना अटक झाली होती. फडणवीस सरकारच्या काळात किशोर वाघ यांच्या 1 डिसेंबर 2006 ते 5 जुलै 2016 या काळातील त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये किशोर वाघ यांच्याकडे तब्बल एक कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे किशोर वाघ दोषी असल्याचा अहवाल देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर किशोर वाघ यांच्यावर निलंबन वगळता इतर कोणतीही कारवाई झाली नव्हती.
चित्रा वाघ यांच्या भाजप प्रवेशानंतर चौकशीच्या फेऱ्यापासून वाचण्यासाठी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, आता लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चित्रा वाघ यांच्या पक्षांतरानंतर त्या गटबाजीमुळे नाराज होऊन पक्ष सोडून गेल्या यात तथ्य नाही. ईडीच्या चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असावा', असं शरद पवार म्हणाले होते.