मुंबई: लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) फॉर्म हे सावत्र भावांनी चुकीचे भरून घेतले असून यामुळे महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येत असल्याचे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं होतं. त्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी टीका करत, राज्याचे गृहमंत्रीच असे म्हणत असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे. तुमचेच पोर्टल असून त्यावर अशी चुकीच्या पद्धतीने माहिती भरली गेल्यास त्यावर राज्य सरकार करताय तरी काय? असा प्रश्नच सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला होता.


तर पुढे बोलाताना लाडकी बहीण योजने शिवाय या सरकारकडे दुसरे तिसरे काहीही नाही. पंधराशे रुपयात महिलांचे मत विकत घेण्याचा कार्यक्रम या सरकारने सुरू केला असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर केली होती. सुप्रिया सुळे यांच्या या टीकेला आता भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh)यांनी एक्सवर एका पोस्टच्या  माध्यमातून प्रत्युत्तर देत बोचरी टीका केली आहे.


लवासाताई वांग्याच्या शेतीतून 110 कोटी कमावतात- चित्रा वाघ


त्यात त्यांनी म्हटले आहे की, बारामतीच्या मोठ्या ताई सुप्रिया सुळे तुम्ही गल्लत करताय. प्रेम प्रेमाच्या जागी असतं आणि कुटुंबाची चिंता कुटुंबातच. ज्यांना छोट्या-छोट्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो, त्यांनाच 1500 रुपयाचे मोल कळते.  लवासाताई, 110 कोटी रुपये जे फक्त वांग्यातून कमवतात, त्यांना ते कसे कळणार? असा प्रश्न उपस्थित करत चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांचा उल्लेख लवासाताई असा केलाय. पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, आणि हो, ज्यांना प्रेम असते, तेच लोक योजना आणतात, जे फक्त स्वतःचा विचार करतात, त्यांना अशा योजना सुचू शकत नाही. त्यामुळे विरोध करण्यापलीकडे तुमच्याही हाती काहीच असल्याची टीका ही त्यांनी केलीय. 


नेमकं काय म्हणाल्या होत्या 


महायुतीचे सरकार आल्यास लाडकी बहिणी योजनेतून तीन हजार रुपये देऊ. सोबतच यापुढेही या योजनेत सातत्य राहणार असून एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना म्हटले. तर, पुढील 5 वर्षांसाठी ही योजना निश्चित सुरू होईल, महिला भगिनींना 5 वर्षांचे 90 हजार रुपये मिळतील, असा शब्द अजित पवार यांनी पुण्यातल्या बालेवाडीतील कार्यक्रमातून दिला.


या घोषणेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली होती. सुरुवातीला महाविकास आघाडीने अशी घोषणा केल्याने ते आता म्हणालेत. मात्र ते फक्त सत्तेत परत येण्याची भाषा करीत आहेत. नेहमी मतांचीच भाषा ते करीत आहेत. लाडकी बहीण योजने शिवाय या सरकारकडे दुसरे तिसरे काहीही नाही. पंधराशे रुपयात महिलांचे मत विकत घेण्याचा कार्यक्रम या सरकारने सुरू केला असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर केली होती.


हे ही वाचा