कोल्हापूर : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन तरुणावर तलवारीने हल्ला केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमध्ये घडली. शहरातील नांदणी नाका रस्त्यावर तरुणावर तलवारीने हा हल्ला करण्यात आला, दरम्यान मुलाच्या आईने मध्येच येऊन तलवारीच्या वारपासून लेकास वाचवले. त्यानंतर, दगड घेऊन हल्लेखोरांच्या अंगावरही माता माऊली धावून गेल्याचं दिसून आलं. जयसिंगपूरमधील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मात्र, या घटनेमुळे कोल्हापुरातील गुन्हेगारी विश्वास पोलिसांचा धाक नसल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू झाली आहे.


दोन गटांत भांडणं, हाणामारी किंवा गटातटाचा वाद हा नवीन नाही. मात्र, भरदिवसा गजबजलेल्या भागात तलवारीने हल्ला झाल्याची घटना घडल्याने परिसरात दहशतीचं वातावरण ननिर्माण झालं आहे. तसेच, पोलिसांच्या कार्यक्षमेतवरही नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जयसिंगपूरमधील धारदार शस्त्राने वार केल्याच्या या घटनेत सुनिल रामाप्पा लमाणी हा युवक जखमी झाला आहे. याप्रकरणी विनोद कासू पवार,अरविंद कासू पवार आणि विनोद बाबू जाधव या तिघांविरुध्द जयसिंगपूर (Kolhapur) पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती आले आहेत. पोलिसांकडून (Police) सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने संशयीतांचा शोध घेण्यात येत आहे. 


दरम्यान, या घटनेत आईच मुलाच्या अंगावर येणारी तलवार वाचवणारी ढाल बनली. त्यामुळे, लेकासाठी जीवावर उदार होऊन लढणारी माऊली पुन्हा एकदा समाजाने पाहिली आहे. या घटनेमध्ये, पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन तरुणावर तलवार हल्ला करण्यात आल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून आरोपींच्या शोधासाठी पथकही नेमण्यात आलं आहे.




हेही वाचा


लाडकी बहीण योजनेतील बदललेला 'हा' नियम माहिती आहे का? तुमच्या फायद्याचा की तोट्याचा, जाणून घ्या! 


महायुतीत राडा, जगदीश मुळीक संतापून म्हणाले, ए मिटकरी देवेंद्र फडणवीसांना खुलासा मागण्याची तुझी पात्रता आहे का?