CM Uddhav thackeray : महाराणा प्रताप (Maharana Pratap) यांचा भव्य अश्वारुढ पुतळा माझगाव येथील महाराणा प्रताप चौकात उभारण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. ऑनलाईन उपस्थितीत राहून मुख्यमंत्र्यांनी पुतळ्याचे अनावर केले. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईचे अस्लम शेख यांची विशेष उपस्थिती होती. मुंबईच्या महापौर  किशोरी पेडणेकरही उपस्थित होत्या. महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. तसेच यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना आपल्या शैलीत प्रत्युत्त दिले आहे.


शस्त्रक्रियेनंतर अद्याप मी घराबाहेर पडलेलो नाही. याचा अर्थ असा नाही की मी घराबाहेर पडण्यासाठी असमर्थ आहे. मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे. त्यामुळे तलावार जरी हातात नसली तरी तलवार कशी गाजवायची हे माझ्या नसा नसा भिनलेले आहे. त्यामुळे तलवर केव्हा गाजवायची चालवायची ती मी योग्यवेळी चालवत आलो आहे. यापुढे देखील चालवत राहणार आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.  



महाराणा प्रताप यांचा भव्य अश्वारूढ पुतळा म्हणजे फक्त एक शिल्प नाही. शौर्य, त्याग, बलिदान आणि स्वाभिमानाचा तो वारसा आहे, असे नगरसेवक यशवंत जाधव म्हणाले. स्वप्नपूर्तीचा आनंद काय असतो, हे मी अनुभवले. या संपूर्ण प्रवासात मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे. माझगाव येथे महाराणा प्रताप यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि मा. आदित्य ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाले, असे ट्विट यशवंत जाधव यांनी केलं आहे.