Satara Latest News : आजही अनेकांच्या मुंडक्यावर बसलेल अंधश्रध्देच भुत उतरता उतरत नाही. अंधश्रध्देच हे भूत उतरवण्यासाठी अंधश्रध्दा निर्मुलन समिती काम करताना पहायला मिळते. याचेच एक उदाहरण आज साताऱ्यातील मल्हारपेठेत पहायला मिळाले.  मल्हारपेठेत राहणाऱ्या शारदाताई बाबर यांच्या डोक्यावर गेली चार वर्षा पासून जटा वाढत चालल्या होत्या. या जटा वाढण्यामागचे कारण म्हणजे शारदाताई बाबर यांना देवाच्या जटा असल्याचे अनेकांनी डोक्यात बिंबवले. आणि त्यांनी त्या तशाच वाढवल्या. मात्र या शारदाताईंच्या वाढत गेलेल्या केसांच्या गुंत्यामुळे त्यांच्या डोक्यावर सुमारे साडेतीन किलोपेक्षाही जास्त वजनाच्या ह्या जटा झाल्या होत्या. या वाढत चाललेल्या केसांच्या गुंत्यामुळे त्यांच्या डोक्यावर मोठ ओझ असल्याचे त्यांना अनेकवेळा जाणवत होते. शिवाय त्यांच्या मानेलाही त्रास होत होता. त्यांना झोपताना रात्रभर एकाच अंगावर झोपावे लागत होतं. त्यामुळे त्यांचा खांद्यालाही वेदना होत होत्या. 


अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे सुरेंद्र शिंदे यांनी आणि शारदाताई यांच्या बहिण उषा वायदंडे यांनी शारदाताई यांची समजूत काढली. शारदाताई या जटा काढण्यासाठी तयार झाल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती डॉ हमीद दाभोलकर यांना दिली. काही वेळातच अनिसची टीम मल्हार पेठेत पोहचली. शारदाताई यांच्या सांगण्यानुसार मला डोक्यावरचे सर्वच केस काढायचे आहेत, असा अट्टाहास धरल्यानंतर त्यांना जवळच्याच केशकर्तनालयात नेहण्यात आले आणि त्यांच्या डोक्यावरचे सर्वच केस काढण्यात आले. डोक्यावरचे केस काढल्यानंतर त्यांनी खदखदून हसत आपल्याला मनापासून आनंद होत असल्याचे सांगताना हात जोडून अनिसचे आभारही मानले. 


केस वेळचेवेळी न धूणे, न विंचरणे, त्याची निगा न राखणे या कारणातून ह्या जटा वाढत असतात. आणि जेंव्हा केसांचा गुंता तयार होतो, तेंव्हा त्या एकमेकाला चिटकून रहातात. लोक त्याला देवाची जटा असे सांगून त्याची देवपूजा करायला सुरवात करतात. समाजातील या अंधश्रध्देच्या पायात अनेक महिलांच्या डोक्यावर तीन किलोच्या वरती आणि सुमारे 10-12 किलोची जट तयार होते. याचा त्रास त्या संबधित महिलेला होत असतो. त्रास होत असताना त्या कोणाला सांगायलाही धजावत नाहीत, कारण समाज काय म्हणेल या विचारात ती महिला हे डोक्यावरच ओझ तसच घेऊन आयुष्य जगत असते. त्यामुळे अशी जट असलेल्या महिलांनी अंधश्रध्दा निर्मुलन समितीशी संपर्क साधावा, असे आ