मुंबई :  महाराष्ट्रातील नवनिर्वाचित शिंदे सरकारनं  भाजपसोबत  सत्तेत येताच महाविकास आघाडीला एकामागेएक धक्के देण्यास सुरुवात केली आहे. सर्वात प्रथम सरकारच्या शेवटच्या कॅबिनेट मीटिंगमधील सर्व निर्णय रद्द केले. त्यानंतर त्यातील काही निर्णय पुन्हा एकदा घेतले. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार काळात अर्थ विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या 941 कोटींच्या नगरविकास विभागाच्या कामांना स्थगिती  दिली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना मोठा  झटका दिला आहे.   अजित पवार  अर्थमंत्री असताना नगर विकास विभागातून मंजूर केलेल्या 941 कोटींच्या नगरविकास विभागाच्या कामांना स्थगिती दिली आहे.  त्यातील एकट्या  बारामती नगरपरिषदेला 245 कोटींचे वितरण झाले होते. तसेच मार्च ते जून 2022 मधील दरम्यानच्य मंजूर कामाला स्थगिती दिली आहे. शिंदे सरकारचा हा निर्णय महाविकासआघाडीसाठी तसेच अजित पवार यांच्यासाठी मोठा झटका आहे.


अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी आपल्या बारामतीला सर्वाधिक निधी दिल्याची चर्चा  होती. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस च्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी शिंदे सरकारने थांबवला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना शिवसेना आमदारांची निधीच्या मुद्द्यावरुन नाराजी होती. राष्ट्रवादीकडे अर्थ खाते होते. अजित पवार यांच्याकडून शिवसेना आमदारांना पुरेसा निधी दिला जात नाही, असा आरोप शिवसेना आमदारांकडून केला जात होता. शिवसेना आमदारांनी अनेक वेळा आपली नाराजी देखील व्यक्त केली होती. 


संबंधित बातम्या :


...अन् शरद पवार म्हणाले, आपण अल्पमतात आहोत, विरोधी बाकावर बसू..., जितेंद्र आव्हाड यांनी सांगितली ती आठवण


Eknath shinde : भाजपबाबत चुकीचा गैरसमज पसरवण्यात आला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


नेत्यांवरील निष्ठा 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर, उद्धव ठाकरे गटाकडून प्रतिज्ञापत्र तर शिंदे गटांकडून समर्थन पत्र


ठाकरे सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा मुख्यमंत्री शिंदेंकडून पुनरावलोकन करण्यात आलं. मागील 6 महिन्यांतील निर्णयाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर ठाकरे सरकारनं रद्द केलेले तब्बल 4 निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं पुन्हा घेतले आहेत