Eknath shinde : आम्ही ज्यावेळी गुवाहटीला गेलो तेव्हा कुणालाच काही माहित नव्हतं, पण मी कुठे नेहतोय हे मला कुणीच विचारलं नाही. मी एकटाच असा होतो की प्रत्येकाचं ऐकायचो, बाळासाहेबांनी भूमिका रोख ठोक होती. त्या विचारांच्या विरूद्ध सर्व सुरू होतं. प्रत्येक विरोधातल्या गोष्टीला विरोध करता येत नव्हता. पण प्रत्येक गोष्टीला एक सीमा असते. त्यामुळे टोकाचं पाऊल उचलण्याची भूमिका आमदारांनी घेतली. काही जण म्हणतात की एकनाथ शिंदे याने राजकिय आत्महत्या केली. पण मी येईन माझ्यासोबत 10 येतील पण बाकीच्यांचे काय? मग मी सर्वांसाठी प्रयत्न केले. म्हणून टोकाचं पाऊल  उचललं जे बाळासाहेबांचे वाक्य होतं अन्याया विरोधात पेटवून उठा ती भूमिका आम्ही स्विकारली. भाजपबाबत चुकीचा गैरसमज पसरवण्यात आला. मोदीनी पाहिलं सत्तेतून आमदार बाहेर पडून भाजपसोबत जाण्यास इच्छुक आहेत हे पाहून आम्हाला ताकद दिली. मग काय सगळं ओके झालं, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 


ऐवढ्या लांबून येऊन सुद्धा कुणाच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नाही. संभाजी नगरमध्येही हेच चित्र पहायला मिळालं. राज्यभरात हेच चित्र पहायला मिळतं. मी मुख्यमंत्री झालोय यावर माझा विश्वासच बसत नाही. पण मी एकटा मुख्यमंत्री नाही हे सर्वही मुख्यमंत्री आहेत. सामान्य माणूस हा मुख्यमंत्री झाला हे चित्र पूर्वी नव्हतं. आम्ही बाळासाहेब आणि दिघे यांच्या हिंदुत्वाची भूमिका घेतली म्हणजे बाकीच्यांवर अन्याय करा असे नाही तेही आपलेच. तेही मला भेटतात. त्यांनाही मी त्यांच्या परिवारातला वाटतो, असेही शिंदे म्हणाले. 


 त्या काळात खूप त्रास झाला, कोण कोण काय त्रास देत होता ते पाहिलं. या 50 आमदारांची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. मलाही काही मिळेल या अपेक्षेने आलो नाही. अन्याय सहन करण्याची परिसीमा ओलांडली म्हणून हे पाऊल उचलावं लागेल. या अडीच वर्षात शिवसेनेला काय झालं? काय झाला सत्तेचा उपयोग हे शिवसैनिकांनीच सांगावे. सरकार आमचे असून ही शिवसैनिकांना फरार घोषित केलं जात होतं मग का आम्ही सहन करायचं. पुढच्या अडीच वर्षात एकाही शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागणार नाही. अन्याय होणार नाही तर अन्याय करायची हिमंत अधिकार्यांनी दाखवावी. तरुणांना आत टाकून त्यांना पक्षांतर करण्यास धमकावले जात होते, असे शिंदे म्हणाले. 


 पंढरपूरचा अनुभव खूप महत्वाचा होता. कोविड नसल्यामुळे लाखो भाविक आले होते. सर्वांच्या तोंडात शिंदे तुम आगे बडो हे शब्द एकूण आम्ही घेतलेली बाळासाहेबांची आणि दिघे साहेबांची भूमिका योग्य असल्याचे जाणवलं. आज जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी झाढून पाठिंबा देत आहेत. (कुणी शिल्लक ठेवले आहेत का ) मिश्किल टोमणा लगावला. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांसोबत कधी तडजोड करणार नाही. तुम्ही निर्णय घेताना विचार करा असा फोन आला तेव्हा सांगितलं आम्ही गेलो, आता पुढे आता विचार करणार नाही. आम्ही घेतलेली भूमिका राज्याच्या हिताची आणि शिवसेना वाचवण्यासाठी घेतलेली भूमिका आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 


पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले. या पुढेही घेऊ त्याचा फायदा राज्यालाच होईल. सगळचं लगेच होणार नाही, पण जे निर्णय घेऊ ते आमच्या नाही तर जनतेच्या हिताचे घेऊ. काही जण म्हणतात मंत्रालयात मी नाही, पण मी जातो तेथे मंत्रालय असतं, असे एकनाथ शिंदे म्हणाले.