Gosekhurd Dam : चार दशकांपासून रेंगाळलेल्या गोसेखुर्द धरणाच्या (Gosikhurd Dam) पाहणीसाठी आज (12 नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) धरणावर पोहोचणार आहेत. धरणावर पोहोचून मुख्यमंत्री पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांकडून गोसेखुर्द धरणाच्या कामासंदर्भात माहिती घेऊन आढावा घेणार आहेत. यासोबतच गोसेखुर्द धरणात एमटीडीसीकडून जल पर्यटन सुरु केले जाणार असून आज मुख्यमंत्री त्याच प्रकल्पाची पाहणी करुन बोटीने प्रवासही करणार असल्याची माहिती आहे.
गोसेखुर्द धरणाची घोषणा 1983 मध्ये करण्यात आली होती. आज या धरणाच्या कामाला सुरुवात होऊन चाळीस वर्ष उलटली आहेत. धरणाचे बांधकाम पूर्ण झाले तरी शेतकऱ्यांच्या बांधावर पूर्ण क्षमतेने पाणी पोहोचलेलं नाही. त्यामुळे एकेकाळी विदर्भासाठी विकासाची भाग्यरेषा ठरेल असे ज्या गोसेखुर्द धरणाबद्दल बोलले जात होते. मात्र हे दावे चार दशकांपासून हवेतच असल्याची सध्याची स्थिती आहे. त्याच गोसेखुर्द धरणाच्या कामाचा आढावा घेण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली आहे.
विशेष म्हणजे 1983 मध्ये गोसेखुर्द धरण जाहीर झाला होता. तेव्हा त्या प्रकल्पाची नियोजित किंमत 372 कोटी रुपये होती. मात्र आज 40 वर्षानंतर गोसेखुर्द धरणाचा बजेट 20 हजार कोटींच्या वर गेला आहे. म्हणजेच गेल्या 40 वर्षात रोज पावणे दोन कोटी रुपये एवढ्या गतीने या धरणाची किंमत वाढली आहे. त्यामुळे याची किंमत आणखी किती वाढणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. आज मुख्यमंत्री या ठिकाणी लवकरच सुरु होणाऱ्या जल पर्यटन प्रकल्पाची ही पाहणी करणार आहे. लवकरच गोसेखुर्द धरणात एमटीडीसीकडून जल पर्यटन सुरु केले जाणार असून आज मुख्यमंत्री त्याच प्रकल्पाची पाहणी करुन बोटीने प्रवासही करणार आहेत.
900 कोटींच्या कामांना मंजुरी
गोसेखुर्द धरण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनासह जोखीम क्षेत्रातील 26 गावांचे पुनर्वसन आणि भंडारा रोड ते भंडारा शहरापर्यंत मेट्रोला मंजुरी अशा सुमारे 900 कोटी रुपयांच्या विकास कामांना गेल्या महिन्यांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली होती. यासोबतच गोसेखुर्द धरण आणि बॅक वॉटर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ व जलपर्यटनाला बैठकीत मान्यता देण्यात आली होती. या जलपर्यटनातून दहा हजार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचा दावा प्रकल्पाच्या आराखड्यात करण्यात आला होता. या विकासकामांमध्ये सभोवतालच्या परिसराचे सौंदर्यीकरण, उजव्या आणि डाव्या कालव्याचे सौंदर्यीकरण, वैनगंगा नदीतीरावर सौंदर्यीकरण, भंडारा ते आंभोरा व गोसे धरणापर्यंत जलपर्यटन, रिसॉर्ट, क्रुज हाऊसबोर्ड, सी बोट, मरीना आणि रॅम्प, बम्परराईड, फ्लाईंग फीश, जेटाव्हेटर, पॅरासिलिंग आधी सुविधांसाठी 315 कोटी खर्च अपेक्षित आहे.
हेही वाचा