Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar District) बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक संबंधातून एकाची दगडाने ठेचून हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास समोर आली आहे. पैठण तालुक्यातील फारोळा गावातील ही घटना आहे. दरम्यान या प्रकरणी बिडकीन पोलिसांनी एका संशियत आरोपीला ताब्यात देखील घेतले आहे. तर कनकोर टाबर चव्हाण (वय 40, रा. म्हारोळा, ता. पैठण) अशी हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, विश्राम कौतुकराव गाडे, (रा. फारोळा,ता. पैठण)  असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फारोळा गावातील कनकोर चव्हाण हा घरावर काम करत असताना पडला, त्यात गंभीर जखमी झाला असल्याने त्याला काही लोकांनी बिडकीनच्या घाटी रुग्णालयात आणून दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासले असता, त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान याची माहिती मिळताच बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरासे आणि गोपनीय शाखेचे कर्मचारी शिवानंद बनगे घाटीत पोहचले. मात्र पोलीस पोहोचेपर्यंत कनकोर चव्हाणला घाटीत घेऊन आलेले लोकं निघून गेले होते. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता, त्याच्या अंगावर एकही जखम नव्हती. मात्र त्याचा डोक्याला मोठ्याप्रमाणावर जखमा असल्याने हा खुनाचा भाग असल्याचे पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी सुरवातीला त्याची ओळख पटवली. 


पोलिसांना संशय आला अन् गेम फसला...


पोलिसांना खुनाचा संशय आल्याने त्यांनी तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान पोलिसांनी अधिक तपास केला असता,  कनकोर चव्हाण याचा अनैतिक संबंधातून  खून करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरासे यांना मिळाली. त्यामुळे त्या दिशेने तपास केला असता, संशियत आरोपी विश्राम गाडेचे ज्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते, त्याच महिलेसोबत कनकोर चव्हाणचे देखील सुत जुळले होते. याची माहिती मिळाल्याने विश्राम गाडेने कनकोरचा गेम करण्याचं ठरवलं. तसेच शनिवारी संधी मिळताच त्याने दगडाने ठेचून कनकोर टाबर चव्हाणची हत्या केली. तसेच कोणालाही संशय येऊ नयेत म्हणून, घरावर काम करत असल्याचा बनाव केला. 


रात्रभर मृतदेह घाटीत पडून...


कनकोर टाबर चव्हाणला जखमी अवस्थेत बिडकीनच्या घाटी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी देखील घाटीत धाव घेऊन पाहणी केली. मात्र मृतदेहाची ओळख पटली नव्हती, तसेच रात्रीच्या वेळी शवविच्छेदन करता येत नसल्याने मृतदेह रात्रभर एका खोलीत पडून होते. तर आज सकाळी डॉक्टरांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


ज्यूसमध्ये उंदीर मारण्याचं औषध टाकून उच्च शिक्षित तरुणाची आत्महत्या; संभाजीनगरमधील घटना