Chhatrapati Sambhaji Nagar Suicide News: छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, उच्च शिक्षित तरुणाने ज्यूसमध्ये उंदीर मारण्याचे औषध टाकून आत्महत्या (Suicide) केली आहे. ही घटना शुक्रवारी (14 एप्रिल) रोजी दुपारी दीड वाजता उघडकीस आली आहे. आत्महत्या करणारा तरुण मेडिकल डिस्ट्रिब्यूटरचे काम करत होता. तर या तरुणाने आर्थिक ताण-तणावातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. राहुल मोहन पाराशर (वय 33 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल पाराशर या तरुणाचे शहरातील नागेश्वरवाडी भागात तनिषा नावाचे दुकान आहे. तो शहरातील औषध विक्रेत्यांना औषध पुरवत होता. दरम्यान, शुक्रवारी राहुलने दुपारच्या सुमारास दुकानात असताना ज्यूसमध्ये उंदीर मारण्याचे अल्युमिनियम फॉस्फेट हे औषध टाकून ते प्राशन केले. त्यामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागले. हा सर्व प्रकार त्याच्या मित्राच्या लक्षात येताच त्याने राहुलला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी देखील त्याच्यावर तात्काळ उपचार सुरु केले. मात्र उपचारादरम्यान सायंकाळी साडेसहा वाजता त्याचा मृत्यू झाला. राहुलने आर्थिक ताणतणावातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. 


आर्थिक ताणतणावातून आत्महत्या केल्याचा अंदाज...


औषध विक्रेत्यांना औषध पुरवठा करण्याचा व्यवसाय करणाऱ्या राहुलची शहरातील नागेश्वरवाडी भागात तनिषा नावाचे दुकान आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो सतत चिंतेत असल्याचा दावा त्यांच्या जवळच्या लोकांनी केला आहे. तर राहुल आर्थिक देवाणघेवाणमुळे देखील तणावात असायचा असेही बोलले जात आहे. त्यामुळे राहुलने आर्थिक ताणतणावातून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. 


अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ 


दुसऱ्या एका घटनेत जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील सावळदबारापासून जवळच असलेल्या अजिंठा डोंगररांगेतील ब्राह्मण खोऱ्यात 35 ते 40 वर्षे वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा मृतदेह शनिवारी (15 एप्रिल) रोजी आढळून आला आहे. पुरुष जातीचा मृतदेह आढळल्याची माहिती अजिंठा वनविभागा कडून फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने अजिंठा डोंगर रांगेतील अत्यंत दुर्गम ठिकाण असलेल्या ब्राह्मण खोऱ्यातील घटनास्थळाची पाहणी केली. तिथे पोलिसांना 35 ते 40 वर्षे वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा तोंडाला आणि नाकाला मार लागेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. तर पोलिसांच्या चौकशीत ही व्यक्ती मागील काही दिवसांपासून याच परिसरात फिरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा व्यक्ती डोंगर चढत असताना पाय घसरुन पडल्याने त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. तर पोलिसांनी पंचनामा करत, पुढील तपास सुरु केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या :


काय सांगता! अख्खी योजनाच गिळंकृत केली, 73 रस्त्यांचे काम न करताच 10 कोटी हडपले; दहा वर्षांनी पोलिसात गुन्हा दाखल